Trending News:चार जिवलग मैत्रिणी एकाच वेळी गरोदर; फोटो शेअर करत एक जण म्हणाली...

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Updated: Jun 13, 2022, 08:13 PM IST
Trending News:चार जिवलग मैत्रिणी एकाच वेळी गरोदर; फोटो शेअर करत एक जण म्हणाली... title=

Viral News: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोत चार जिवलग मैत्रिण गरोदर असल्याचं दिसत आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे असा योगायोग त्यांच्यासोबत एकदा नव्हे तर दोनदा घडला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ एका मैत्रिणीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चारही मैत्रिणी अमेरिकेतील आहेत.

अमेरिकाच्या हवाई बेटावर राहणारी मॅडी कॅस्टेलानो एक टिकटॉकर आणि इंफ्लूएंसर आहे. तिने हा व्हिडीओ मैत्रिण रँडी पार्क, ब्रिटनी केंट आणि लू बीस्टोन यांच्यासोबत शेअर करत  योगायोग सांगितला आहे. व्हिडीओमध्ये चार मैत्रिणींच्या गरोदरपणाचा फोटो शेअर करताना मॅडीने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुमच्यापैकी काहींना आठवत असेल की, आपण सर्व जिवलग मैत्रिणी या आधीही एकाच वेळी गरोदर झालो होतो.

मॅडी पुढे म्हणाली की, आमचं पहिलं बाळंतपण एकमेकांपासून काही आठवड्यांच्या अंतराने झालं होतं. तेव्हा आमच्या मुलांना जन्मापासूनच एकमेकांचे चांगले मित्र मिळाले आहेत. आता पहिल्या मुलांच्या जन्मानंतर एक वर्षानंतर, या चार महिला मैत्रिणी एकत्र पुन्हा गर्भवती झाल्या आहेत आणि काही दिवसांनंतर त्या आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत.