मुंबई: भारतात सध्या २०१८ या वर्षातली शेवटची रात्र साजरी केली जात आहे. थोड्याचवेळात भारतीयांकडून नववर्षाचे स्वागत केले जाईल. मात्र, चीन न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया २०२० चं आगमनही झाले आहे. काहीवेळापूर्वीच या देशांमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजीही करण्यात आली.
सर्वप्रथम न्यूझीलंडमध्ये नववर्षाची पहाट उजाडली. भारतीय प्रमाणवेळेनुसार ७ वाजून ३० मिनिटांनी न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नववर्षाचा जल्लोष सुरू झाला. न्यूझीलंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियात नववर्षाचे आगमन झाले. यावेळी सिडनीतील प्रसिद्ध हार्बर ब्रीज आणि ऑपेरा हाऊस येथे फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. नववर्षाच्या स्वागतासाठी याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
यापाठोपाठ आता पूर्वेकडच्या अन्य देशांतही नववर्षाचे आगमन होत आहे. काहीवेळापूर्वीच चीनमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
#WATCH: Hong Kong rings in the New Year; celebrations at Victoria Harbour. pic.twitter.com/aEwHGiTOy9
— ANI (@ANI) December 31, 2019
भारतामध्येही सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी लोक सार्वजनिक ठिकाणी जमले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी यासह विविध चौपाट्यांवर नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीप्रमाणे गर्दी जमली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Japan: Visuals of #NewYear celebrations from Tokyo. pic.twitter.com/N2fxA5NQpT
— ANI (@ANI) December 31, 2019
#WATCH: Thailand rings in the New Year; fireworks display along the Chao Phraya River. pic.twitter.com/EJYLAqflmI
— ANI (@ANI) December 31, 2019