2 महिन्यात दुसऱ्यांदा 'या' देशाला लागली लॉटरी! जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला; एकूण किंमत...

Gold Reserves Discovered: मागील दोन महिन्यांमध्ये या देशात दोन मोठ्या सोन्याच्या खाणी सापडल्या असून यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार आहे.

Updated: Feb 11, 2025, 08:49 AM IST
2 महिन्यात दुसऱ्यांदा 'या' देशाला लागली लॉटरी! जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला; एकूण किंमत... title=
दोन महिन्यात दुसऱ्यांदा सापडली सोन्याची खाण (प्रातिनिधिक फोटो)

Gold Reserves Discovered: भारताचा शेजारी असलेल्या चीनला दोन महिन्यात दोन जॅकपॉट लागले आहेत. चीनमध्ये सोन्याचा 12 लाख किलोंचा साठा उत्खनन करुन बाहेर काढला. या सोन्याच्या विक्रीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाल्याचं समजतं. चीन हा जगातील सर्वाधिक सोन्याचं उत्पन्न घेणारा देश आहे. 2023 साली जगातील एकूण सोन्यापैकी 10 टक्के सोनं एकट्या चीनमधील खाणींमधून काढण्यात आलेलं, असं वर्ल्ड गोल्ड काऊन्सीलचा डेटा सांगतो. 

दुसऱ्यांदा लॉटरी

नोव्हेंबर 2024 मध्ये चीनमध्ये सोन्याचा मोठा साठा आढळून आलेला. 7 लाख 25 हजार 731 कोटी रुपये किंमत असलेला हा सोन्याचा साठा मध्य चीनमधील  हुआन प्रांतात आढळून आलेला. जानेवारी 2025 मध्ये चीनला पुन्हा एक सोन्याचा साठा सापडल्याची माहिती समोर आली आहे. 1 लाख 68 हजार किलोंचा सोन्याचा साठा सापडला आहे. सोन्याचे हे साठे गान्सू, मंगोलियाचा अंतर्गत भाग आणि हायलाँगजीआंग या प्रांतांमध्ये आढळून आले आहेत. 

पूर्वी सर्वाधिक सोनं सापडण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता

नोव्हेंबर 2024 मध्ये चीनला 1 हजार मेट्रीक टन म्हणजेच 10 लाख किलो नैसर्गिक सोनं सापडलं. पीनजीयांग प्रांतात हे सोनं सापडलं. या सोन्याची किंमत 6,91,473 कोटी रुपये इतकी आहे. जगात कोणत्याही देशाला सापडलेला हा सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे. त्याआधी सर्वाधिक सोनं सापडण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. येथे 9 लाख 30 हजार किलो सोनं साऊथ डीप माईन येथील खाणींमध्ये सापडलेलं. 

दोन किलोमीटरवर 3 लाख किलो सोनं

चीनमध्ये सध्या सापडलेल्या सोनच्या साठ्यासंदर्भातील सर्वेक्षणानुसार, दोन किलोमीटर खोलीवर 3 लाख किलो सोन्याचा साठा आहे. नवीन थ्री डी तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध घेतला असता हे सोनं जमिनीमध्ये तीन किलोमीटरपर्यंत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सर्वाधिक सोनं असलेले देश कोणते?

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक सोन्याचे साठे असलेल्या देशांमध्ये अव्वल तीन स्थानांवर अमेरीका, जर्मनी आणि इटली या देशांचा समावेश आहे. अमेरिकेकडे 81 लाख 33 हजार किलो सोनं असल्याचं वर्ल्ड गोल्ड काऊन्सीलचा अहवाल सांगतो. या यादीमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या देशांकडे असलेल्या एकत्रित सोन्याच्या साठ्यापेक्षाही अधिक साठा अमेरिकेकडे आहे. यादीत चौथ्या स्थानी फ्रान्सचा क्रमांक लागतो. यादीत चीन सहाव्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे 22 लाख 64 हजार किलो सोनं आहे. भारताकडे 8 लाख 40 हजार किलो सोनं आहे.