वॉशिंग्टन : भारताच्या 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर Times Square शनिवारी तिरंगा फडकवण्यात आला. या प्रसिद्ध ठिकाणी प्रथमच भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. न्यूयॉर्कमध्ये भारताचे वाणिज्य जनरल Consul General of India रणधीर जयस्वाल Randhir Jaiswal यांनी टाईम्स स्क्वेअरवर ध्वजारोहण केलं. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या भारताच्या निर्मितीसाठी एक रोडमॅप तयार केला असून आम्ही त्याच चौकटीत देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असं रणधीर जयस्वाल यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
USA: Randhir Jaiswal, Consul General of India in New York, hoists Indian national flag at the Times Square at an event organised by Federation of Indian Associations (FIA), as part of Independence Day celebrations. pic.twitter.com/z4GGac2z8A
— ANI (@ANI) August 15, 2020
दुसरीकडे, कॅनडाच्या टोरंटोमधूनही तिरंग्याच्या रंगातील Niagara Fallsचे काही फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले. दुबईतील Burj Khalifaवरही तिरंगा पाहायला मिळाला.
Stunning view of Niagara falls in Indian colours. #AatmaNirbharBharat @IndoCanadaArts @_apoorvasri @HCI_Ottawa @cgivancouver @MEAIndia @DrSJaishankar @PMOIndia @ICCR_Delhi @nadirypatel @IndianDiplomacy @incredibleindia @prahladspatel @smritiirani pic.twitter.com/5k3YMNR3qV
— IndiainToronto (@IndiainToronto) August 16, 2020
#WATCH United Arab Emirates: Burj Khalifa illuminated in colours of the Tricolour on #IndiaIndependenceDay. (Video source: Consulate General of India, Dubai) pic.twitter.com/GKn1BVqjW4
— ANI (@ANI) August 15, 2020
United States: The Empire State Building in New York illuminated in the colours of the Indian national flag. #IndependenceDay. pic.twitter.com/QxoN7rL7yY
— ANI (@ANI) August 16, 2020
अमेरिकेव्यतिरिक्त जगातील विविध भागात राहणाऱ्या भारतीयांनी तिरंगा फडकवून आणि राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत गाऊन भारताचा 74वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.