इंडोनेशियामध्ये त्सुनामी, १६८ जणांचा मृत्यू तर ६०० जण जखमी

ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं ही त्सुनामी आल्याची माहिती

Updated: Dec 23, 2018, 02:15 PM IST
इंडोनेशियामध्ये त्सुनामी, १६८ जणांचा मृत्यू तर ६०० जण जखमी title=

जकार्ता : इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा त्सुनामी आलीय. या त्सुनामीमध्ये आत्तापर्यंत १६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६०० जण जखमी झाले आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं ही त्सुनामी आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्सुनामीमुळे जावाचा दक्षिणी भाग आणि दक्षिणी सुमात्राच्या किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामीनं अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री ९.३० वाजता ही त्सुनामी आल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं समुद्राच्या आत भूस्खलन झालं आणि लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या. त्यानंतर लाटांनी त्सुनामीचं स्वरुप धारण केलं. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.

'Volcano tsunami' hits Indonesia, 168 killed, nearly 700 injured

इंडोनेशियाच्या हवामान खात्यानं म्हटलं आहे की, अनाक क्राकाटाओ ज्‍वालामुखीचा उद्रेक झाल्याने त्सूनामी आली. पौर्णिमामुळे यात आणखी भर पडली. त्यामुळे उंच उंच लाटा उसळल्या. इंडोनेशियाचं सरकार यामागचं खरं कारण शोधण्याच्या कामात लागलं आहे. तर काही अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, ही त्सूनामी नाही तर फक्त उंच लाटा आहेत.

राष्ट्रीय आपात्कालीन विभागाचे प्रवक्ता स्तुपो पुर्वो यांनी म्हटलं की, शनिवारी रात्री आलेल्या या उंच लाटांमुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे.' याआधी सप्टेंबरमध्ये इंडोनेशियाच्या सुलावेसी द्वीपजवळ भूकंपामुळे उत्पन्न झालेल्या त्सुनामीमध्ये 832 जणांचा मृत्यू झाला होता.