तेहरान : उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला न घाबरता नव्याने क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यामुळे जगावर राज्य गाजविणाऱ्या अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर कोरियानंतर इराणने भिक घातलेली नाही.
उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले होते. दोन वेळा ही चाचणी केली. त्यानंतर अमेरिका आणि उत्तर कोरियात जोरदार शाब्दीक संघर्ष सुरु आहे. आता तर इराणनेही अमेरिकेला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. इराणने शनिवारी अमेरिकेचा इशारा धुडकावून लावत नवीन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली.
इराणने खोरामशहर हे नवीन क्षेपणास्त्र विकसित केलेय. तिथल्या सरकारी वाहिनीवर या क्षेपणास्त्र चाचणीची व्हिडीओ दाखवण्यात आला. शुक्रवारी तेहरानमधल्या लष्करी संचलनात हे क्षेपणास्त्र दाखवण्यात आले होते.
यापूर्वी इराणने क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर त्यांच्यावर अनेक निर्बंध टाकण्यात आले होते. इराणने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम असाच सुरु ठेवला तर, त्यांच्यावर आणखी निर्बंध येऊ शकतात.