इस्राईलने घेतला बदला, सिरीयाच्या १२ ठिकाणांवर केला हल्ला

इस्राईलच्या सेनेने पहिल्यादा सीरियामध्ये ईरानी सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. असा दावा त्यांनी केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 11, 2018, 09:00 PM IST
इस्राईलने घेतला बदला, सिरीयाच्या १२ ठिकाणांवर केला हल्ला title=

नवी दिल्ली : इस्राईलच्या सेनेने पहिल्यादा सीरियामध्ये ईरानी सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. असा दावा त्यांनी केला आहे.

इस्राईलच्या सेनेचे प्रवक्ते जोनाथन कोनरीकस यांनी सांगितलं की, आम्ही १२ ठिकाणांना लक्ष्य केलं आहे ज्यामध्ये ८ सीरियाच्या हवाई रक्षा प्रणालीशी संबधित आहे. यांनीच इस्राईलच्या विमानावर मिसाइल टाकले होते. इतर चार ठिकाणं खास आहेत कारण ते सिरीयामधील ईरानी सैन्याची ठिकाणं आहेत.

शनिवारी सकाळी इस्राईलने त्यांच्या सीमेभोवती एक ईरानी ड्रोनला उडवलं होतं. जो या ठिकाणी नजर ठेवून होता. यानंतर इस्राईल विमान सीमापार करुन सीरियाच्या भागात ईरानी ड्रोन संचालन केंद्राला उडवण्यासाठी गेले. या दरम्यान सीरियाच्या विमान उडवणाऱ्या तोफांच्या या फायरिंगमध्ये एक इस्राईलचं लढाऊ विमान कोसळलं.

यानंतर इस्राईलने पुन्हा ताकद लावत सीरियावर हल्ला केला. आणि १२ ठिकाणं नष्ट केली. ८ वर्षानंतर इस्राईलने इतकी मोठी कारवाई केली.