अमेरिका : चार महिन्यांपूर्वी जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती हा किताब पटकवारा, अमेझॉनचा संस्थापक जेफ बेझॉस आता अजुनच श्रीमंत झाला आहे.
नुकताच त्याने १०० बिलियन अमेरिकन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे.
अमेझॉनच्या 'ब्लॅक फ्रायडे' महासेलने जेफला ही १२ अंकी संपत्ती मिळवण्यास मदत केली आहे. या सेलमध्ये त्यांना ६.५ लाख करोड रूपयांचे मालक बनवले.
मायाक्रोसॉफ्टचे को फाऊंडर यांनी काही वर्षांपूर्वी संपत्तीचा हा आकडा गाठला होता. त्यानंतर १९९९ नंतर जेफ बेझॉस यांनी १०० बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचण्याचा मान मिळवला आहे.
बेझॉसकडे बेल गेट्सच्या तुलनेत १०.९ बिलियन डॉलर्स अधिक नेटवर्थ संपत्ती आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी बिल गेटसहून अधिक संपत्ती मिळवत जगात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे.
बेझॉस यांचे अमेझॉनचे शेअर्स तेजीत आहेत. यंदा यामध्ये 58% वाढ झाली आहे.