king charles III Coronation Viral video : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र charles यांना राजेपद बहाल करण्यात आलं. नुकतंच Westminster Abbey येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात किंग चार्ल्स III (king charles III ) यांचा राज्याभिषेक करत त्यांच्या डोक्यावर ब्रिटनच्या राजघराण्याचा मुकूट चढवण्यात आला. यावेळी राजघराण्यातील सर्व सदस्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती.
प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स विलियम आणि केट यांनीही त्यांच्या तिन्ही मुलांसह या सोहळ्याला हजेरी लावत तिथं आलेल्या हजारोंच्या जनसमुदायाचं स्वागत केलं. संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरलेल्या या प्रसंगाचं थेट प्रक्षेपणही करण्यात आलं होतं. विविध देशांमधून विविध वेळांवर हे प्रक्षेपण पाहिलं गेलं. त्या क्षणाचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही त्यानंतर लगेचच व्हायरल करण्यात आले. एका राजाचा राज्याभिषेक कसा होतो हे लक्षपूर्वक पाहत असतानाच एकाला नव्हे, तर बऱ्याच नेटकऱ्यांना असं काहीतरी दिसलं की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
Anyone else just notice the Grim Reaper at Westminster Abbey? #Coronation pic.twitter.com/77s4XIY17i
— Joe (@realjoegreeeen) May 6, 2023
जोई ग्रीन या ट्विटर अकाऊंटवरून राज्याभिषेक सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोषस मीडियावर शेअर करण्यात आला. ज्याच्या कॅप्शनमध्ये युजरनं लिहिलं, इतर कोणीसुद्धा वेस्टमिंस्टर अॅबीमध्ये 'ग्रिम रीपर' (Grim Reaper) पाहिला का?
नेटकऱ्याचा हा प्रश्न पाहून तातडीनं त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओकडे सर्वांच्या नजरा वळल्या. हा व्हिडीओ प्ले करून पाहिलं तर, काय अनेकांनाच त्यात संपूर्ण काळ्या रंगाची, हातात एक हत्यार असणारी सावली दिसली. ही सावली नसून, खुद्द काळच असल्याचं म्हणत मृत्यूशी नातं जोडल्या जाणाऱ्या ग्रिम रीपरचा संदर्भ तिथं देण्यात आला.
अनेकांनीच तो व्हिडीओ थांबवून थांबवून पाहिला, वारंवार पाहिला. पण, या सावलीचं गुढ काही उकललं नाही. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला, कैक तर त्यावर व्यक्तही झाले. 'काळ... तोही तिथं?', 'तो कोणासाठी आला असावा...' असे एक ना अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले. अर्थात त्यांच्या प्रश्चांची उकल काही झालीच नाही.
ब्रिटनच्या राजघराण्यावर कोणत्या नकारात्मक शक्तीचं सावट आहे का ? असे प्रश्न जर तुम्ही थेट कोणा व्यक्तीला किंवा गुगललाच विचारणार असाल तर आताच थांबा. कारण, ती आकृती म्हणजे मृत्यू नाहीच मुळी... Newsweek नं याबाबतचं उत्तर शोधून काढत थेट वेस्टमिंस्टर अॅबीशी संलग्न व्यक्तींना गाठलं. जिथं ही व्यक्ती म्हणजे इंग्लंडच्या धर्मपीठाची अधिकारी अर्थात Verger असल्याचं सांगण्यात आलं.