Chip implant to open home doors and car instantly: घराची किंवा गाडीची चावी विसरणं आपल्या सर्वांसाठी काही नवीन बाब नाही. पण आपली चावी जर आपल्या हातातच बसवली गेली तर? चावी हरवण्याचा त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी एका माणसाने अनोखी शक्कल लढवली आहे. या माणसाने स्वतःच्या हातातच चिप बसवून घेतल्या आहेत, ज्यामुळे त्याची गाडी आणि घराचे दरवाजे सहज उघडू शकतात. इंटरनेट ऑफ थिंग्स (Internet Of Things - IOT) मुळे हे शक्य झालं आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क आपल्या हातात एक सेन्सर बसवताना पाहायला मिळतो. या टेक्नॉलॉजीला Vivokey Apex असं बोललं जातं. या माणसाचं नाव Brandon Dalaly असल्याचं समजतं. याने आपल्या उजव्या हातात एक सेन्सर चिप इम्प्लांट केली आहे. या चिपच्या साहाय्याने तो आपली कार सहज लॉक किंवा अनलॉक करू शकतो. तुम्हाला ही बाब कदाचित वेडेपणा वाटू शकेल, पण हे खरं आहे. तुम्हीकदाचित अशा गोष्टी सिनेमांमध्ये पहिल्या असतील.
ब्रॅंडनने स्वतःच्या हातात ही चिप बसवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. हातात बसवलेली ही चिप बायोकंपॅटीबल आहे. स्वतः ब्रॅंडन याने हा व्हिडीओ ट्विटर आणि युट्यूबवर वर अपलोड केला आहे. यासाठी ब्रॅंडनला 400 डॉलर्स खर्च आला. VivoKey Apex चिप ही Apple Pay सोबतच काम करते. ब्रॅंडनने आपल्या डाव्या हातातही एक चिप बसवली आहे ज्याने त्याला घराचा दरवाजा उघडू किंवा लॉक करू शकतो.
इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) मुले जग बदलतंय. यामुळे आपलं आयुष्य अधिक सुकर होतंय याचंच हे एक उत्तम उदाहरण म्हंटलं तर वावगं ठरू नये. चला पाहुयात याच बब्रॅंडनचा हा जबरदस्त व्हिडीओ.
Finally decided to take my phone key issues in to my own hands... literally. Tesla key chip implant. pic.twitter.com/RVK8ZaePoI
— Brandon Dalaly (@BrandonDalaly) August 16, 2022
भारतातही असं तंत्रज्ञान येत्या काही काळात येईल याबाबत शंका नाही. तुम्ही अशा तंत्रज्ञानाचा वापर कराल का? बातमीच्या खाली कमेंटमध्ये आपलं मत जरूर नोंदवा.