मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एका प्रसिद्ध रशियन रिपोर्टरनं पंतप्रधान मोदींना विचारलेल्या प्रश्नावरून सोशल मीडियावर एकच कल्ला झालाय.
नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी (एनबीसी) ची रिपोर्टर मेगिन केली हिनं पंतप्रधान मोदींची भेट घेऊन मुलाखत घेतली... खरं म्हणजे, आपण ज्या व्यक्तीची मुलाखत घेत आहोत त्या व्यक्तीबद्दल रिपोर्टरनं अभ्यास करून जाणं अपेक्षित असतं... पण, मेगिन हिनं मात्र हा अभ्यास केला नव्हता असंच दिसतंय. परंतु, मोदींनी मात्र आपली मुलाखतकार मेगिन हिच्याबद्दल अगोदरपासूनच अभ्यास केला होता.
Before dinner, had a brief interaction with noted journalist & commentator @megynkelly, moderator of tomorrow's session at the @SPIEF. pic.twitter.com/5CQ58Zn5hP
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2017
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामोरं जात मेगिन हिनं त्यांच्याशी हस्तांदोलन केलं... यावेळी पंतप्रधान मोदींनी मेगिन हिला तिनं ट्विटरवर छत्रीसोबत शेअर केलेल्या एका फोटोला दाद दिली... यावेळी मेगिन हिनं पंतप्रधानांना प्रश्न केला 'तुम्ही ट्विटरवर आहात?'
EXCLUSIVE: NBC News' @megynkelly joins Vladimir Putin and Narendra Modi ahead of tomorrow's International Economic Forum in Russia. pic.twitter.com/L12ahtuTDO
— NBC News (@NBCNews) June 1, 2017
या प्रश्नावर मोदींनाही आश्चर्य वाटलं असावं? पण, त्यांनी आपल्या हास्यात ही वेळ मारून नेली... आणि पुतीन यांनीही त्यांना साथ दिली.
Dear @megynkelly here is ur twitter profile vs @narendramodi sir profile,still u ask that r u on twitter. Wats d population f ur country btw pic.twitter.com/bFcanO6iLP
— Kumar Amritansh (@Banarasi_Hindu) June 2, 2017
साहजिकच, यावरून सोशल मीडियात आश्चर्य व्यक्त करत हास्याचे फवारे न उडवले गेले तरच नवल...