अशिया दौऱ्यात ट्रम्प मागतायत युद्धाची भीक - उत्तर कोरिया

 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 11, 2017, 10:19 PM IST
अशिया दौऱ्यात ट्रम्प मागतायत युद्धाची भीक -  उत्तर कोरिया title=

 

सोल : अशियायी दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाविरूद्ध व्यक्त केलेली मते. तसेच, विविध राष्ट्रांना मागितलेल्या मदतीवर उत्तर कोरियाने शेलक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. अशियायी दौऱ्यात ट्रम्प हे अनेक राष्ट्रांकडे युद्धाची भिक मागत असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.

ट्रम्प यांनी दाखवला खरा चेहरा

उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या भूमिकेचा, वक्तव्याचा आणि इतर सर्व राष्ट्रांना मागितलेल्या मततीतून ट्रम्प यांचा खरा चेहरा समोर आला आहे. ट्रम्प यांना जगात शाती आणि स्थिरतेचा विनाश प्रस्तापीत करायचा आहे. त्यामुळेच ते कोरियाई द्वीपमध्ये युद्धाची भीक मागताना दिसत आहे.

अण्वस्त्रांमुळे उत्तर कोरियाचा विनाश होऊ शकतो

दरम्यान, ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाच्या असेब्लितून भाषण करून उत्तर कोरियाला इशारा दिला होता. दक्षिण कोरियाच्या नॅशनल अॅसेंब्लीतून बोलताना ट्रम्प यांनी, किम जोंग उनच्या अतिअण्वस्त्र लालसेपोटी उत्तर कोरियाचा विनाश होऊ शकतो. किंम जोंग जी शस्त्रं बाळगत आहेत ती, मुळीच सुरक्षित नाहीत. ती उत्तर कोरियाला विनाशाकडे घेऊन चालली आहेत. तुम्ही जितके अंधाराकडे वाटचाल कराल तितक्याच तुमच्या अडचणीही वाढत जातील, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

अण्वस्त्रे आवश्यकच

दरम्यान, ट्रम्प यांच्या अशियायी यात्रेनंतर पहिल्यांदाच उत्तर  कोरियाकडून प्रतिक्रिया आली आहे. यात ट्रम्प यांना युद्धखोर असे संबोधन्यात आले आहे. तसेच, आत्मरक्षणासाठी उत्तर कोरिया अण्वस्त्रांचे समर्थन करते असा पुनरूच्चार केला आहे.