Trending Challenge: ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त दहा सेकंदाचा अवधी आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये टायमर सेट करून शोध मोहीम सुरु करा. फोटोवर आपली नजर फिरवा आणि बुद्धीचा कस लावा. (optical illusion You have 10 seconds to find the dear hidden in this photo nz)
या चित्रात एक हरिण लपून बसले आहे. पण फोटो अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे की, तुमचे मन गोंधळून जाईल आणि हरणाचा शोध घेणे कठीण होईल. या जंगलाच्या मधोमध एखादे हरीण दिसले तर तुमच्या मेंदूचे कौतुक करावे लागेल.
हरीण शोधण्यापूर्वी, आपल्या मोबाइल फोनमध्ये 10 सेकंदांचा टायमर सेट करण्यास विसरू नका. फोटोकडे सतत लक्षपूर्वक पाहिल्यास उत्तर मिळण्याची शक्यता वाढू शकते. जर तुम्हाला उत्तर सापडत नसेल, तर फोटोच्या उजव्या बाजूला लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला हरीण दिसले नाही तर काही फरक पडत नाही, खालील फोटोत योग्य उत्तर पहा...
या ऑप्टिकल भ्रमात हरीण शोधण्यात अनेकांना अपयश आले. या फोटोत लपलेले हरण अवघ्या 10 सेकंदात काही कुशाग्र बुद्धीच्या लोकांना सापडले. जर तुमचाही या लोकांमध्ये समावेश असेल, तर तुमचा मेंदू (शार्प ब्रेन) आणि डोळे, दोन्ही उत्कृष्ट आहेत.