Indo-Pak : भारतासोबत आर्थिक व्यवहार करण्यासंदर्भात पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय

भारतासोबत व्यवहार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. आता जून २०२१ पर्यंत पाकिस्तान भारताकडून कापसाची (India Pakistan cotton trade) आयात करू शकणार आहे. तसेच काही पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार साखरेची आयात करण्याबाबतही लवकरच निर्णय होऊ शकतो. 

Updated: Mar 31, 2021, 04:02 PM IST
Indo-Pak : भारतासोबत आर्थिक व्यवहार करण्यासंदर्भात पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय title=

मुंबई : भारतासोबत व्यवहार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. आता जून २०२१ पर्यंत पाकिस्तान भारताकडून कापसाची (India Pakistan cotton trade) आयात करू शकणार आहे. तसेच काही पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार साखरेची आयात करण्याबाबतही लवकरच निर्णय होऊ शकतो. 

२०१९ पासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण आर्थिक संबंध

२०१९ मध्ये जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्याने पाकिस्तानचा थयथयाट झालेला. पाकिस्तानने भारतासोबतचे व्यवहार बंद केलेले. तर दुसरीकडे पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के ड्युटी लावायला सुरूवात केली. 

त्यामुळेच भारत आणि पाकिस्तानमधले आर्थिक संबंध तणावपूर्ण बनलेले. २०२० मध्ये कोरोनाचा काळ पाहता, पाकिस्तानने भारतामधून आयात होणाऱ्या औषधांवरील निर्बंध मागे घेतलेले. 

पाकिस्तानमध्ये कापसाचे दर कमालीचे वाढलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान कॉमर्स अॅडवायझर अब्दुल रजाक दाऊद पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत बैठक घेतली. आणि त्यानंतर पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉर्डिनेशन समितीने आज एक अहवाल सादर केला.

या अहवालात भारतासोबत कापूस आणि साखरेची आयात सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या प्रस्तावाला पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.