कराची : पाकिस्तानने शनिवारी अरबी समुद्रात एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती समोर येत आहे. या चाचणीचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
पाकिस्तानतर्फे अरबी समुद्राच्या उत्तर भागात ही क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. एका हेलिकॉप्टरद्वारे जहाज नष्ट करत ही चाचणी करण्यात आल्याची माहिती पाक नौसेनेचे प्रमुख मोहम्मद जकाऊल्ला यांनी दिली.
पाकिस्तानी नौसेनाच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, ही यशस्वी चाचणी म्हणजे पाकिस्तानच्या युद्ध क्षमतेचं एक प्रमाणचं आहे. मोहम्मद जकाऊल्ला यांनी सांगितले की, पाकिस्तानी नौसेनेची ही युद्धाची तयारी पाहून मला गर्व झाला आहे.
Pakistan Navy test fired AM-39 Exocet Anti Ship Missile in the Arabian Sea today. pic.twitter.com/kU1lKZxCWk
— Pakistan Defence (@defencepk) September 23, 2017
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये म्हटलं की, भारतातर्फे सुरु करण्यात आलेली कथित सैन्य तयारीच्या विरोधात आम्ही क्षेपणास्त्र विकसित केले आहेत.
अब्बासी यांनी पूढे म्हटलं की, एलओसी जवळ भारतीय सेना काश्मीरी नागरिकांच्या मुख्य समस्या लपविण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या भारत खूपच आक्रमकता दाखवत आहे. मात्र, पाकिस्तान विश्वास आणि सन्मानाने भारतासोबत नातं ठेवण्यास इच्छूक आहे.