नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 27 आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत. आपल्या 3 देशांच्या या दौऱ्यात पंतप्रधान सगळ्यात आधी 2 दिवस आपल्या 'ऐतिहासिक' दौऱ्यासाठी रवांडाला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यानची सगळ्यात महत्त्वाची गोष्टमध्ये रवांडाला जाणारे पंतप्रधान मोदी पहिलं भारतीय पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदी रवांडाला 200 गायी भेट म्हणून देणार आहेत. रवांडाच्या गिरिंका योजनेअंतर्गत या गायी रवांडाला देणार आहेत.
'गिरिंका' हा रवांडाच्या सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. 'गिरिंका'चा अर्थ 'एक गाय ठेवा असा होतो. रवांडानंतर पंतप्रधान 24 जुलैला युगांडाला जाणार आहेत त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान ते ब्रिक्स संमेलनात भाग घेणार आहेत. ज्यामध्ये ते आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेच्या मुद्दावर चर्चा करणार आहेत.
जोहानसबर्गमध्ये आयोजित 10 व्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका देशांचा समूह) संमेलनात पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांमधील या बैठकीत द्विपक्षीय संबंधांवर चर्ता होणार आहे.