मुंबई : पंतप्रधान मोदींनी वाढवलेल्या दाढीची सध्या देशभरात चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाढी वाढवली आहे. पण त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. मोदींच्या या नव्या लूकमुळे पाकिस्तानला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली आहे.
पंतप्रधान मोदींनी स्टाईल स्टेटमेंट बदललं, तर पाकिस्तानला धडकी भरली आहे. शिवरायांनी अटकेपार लावलेल्या झेंड्यांची दहशत अजूनही पाकिस्तानमध्ये कायम आहे. मराठ्यांनी त्यांचं साम्राज्य जसं काबूलपर्यंत वाढवलं. तसाच मोदींचा इरादा आहे की काय, म्हणून पाकिस्तान टेन्शनमध्ये आहे. त्यातच टँकवरचे मोदी पाहिल्यावर तर आणखीनच कापरं भरलं.
पाकिस्तानच्या नियो न्यूज चॅनेलवर तर मोदींनी दाढी का वाढवली, यावर एक चर्चासत्रही झालं. मोदींच्या दाढीवर देशातही चर्चा झाली. मोदी दाढी वाढवून काय करणार आहेत, काय माहीत, असं राहुल गांधी म्हणाले. तर मोदी दाढी वाढवून एखाद्या ऋषिसारखे किंवा लढवय्यासारखे दिसतायत, असं थरुर म्हणाले.
पाकिस्तानमधल्या नियो टीव्हीनं तर मोदींनी दाढी का वाढवली, हे विचारायला एका ज्योतिषालाही बोलावलं.
कोरोना काळात ब-याच जणांनी दाढी वाढवली. क्रिस्टोफर ओल्डस्टोन नावाच्या एका विद्वानानं तर कोरोना काळात दाढीवर पुस्तकही लिहिलं. बीयर्ड्स एंड मेन, द रिवीलिंग हिस्ट्री ऑफ़ फेशियल हेयर असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्यात तो म्हणतो दाढी ही आपोआप वाढते किंवा काहीतरी इच्छा मनात धरुन दाढी वाढवली जाते. मोदींची दाढी वाढवण्यामागे काय इच्छा आहे, छत्रपती शिवरायांसारखे मोदी आपल्यावर चाल करुन तर येणार नाहीत ना, या विचारानंच सध्या पाकिस्तान घाबरल आहे.