प्रिन्सेस डायनासोबत जे झालं तेच...; कोण करत होतं प्रिन्स हॅरी यांच्या कारचा पाठलाग? तो धडकी भरवणारा क्षण जगासमोर

British Royal Family : पुन्हा तिच वेळ आलेली? प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नीचे ब्रिटनच्या राजघराण्याशी असणारे संबंध पाहता या प्रकरणाकडे सारं जग गांभीर्यानं पाहत आहे. 

सायली पाटील | Updated: May 18, 2023, 07:44 AM IST
प्रिन्सेस डायनासोबत जे झालं तेच...; कोण करत होतं प्रिन्स हॅरी यांच्या कारचा पाठलाग? तो धडकी भरवणारा क्षण जगासमोर  title=
prince harry and wife meghan markle faced catastrophic car chase in new york

British Royal Family : ब्रिटनच्या शाही घराण्यानं काही दिवसांपूर्वीच ऐतिहासिक क्षण अनुभवण्याची संधी संपूर्ण जगाला दिली. जिथं King Charles III यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेकांनीच हजेरी लावली होती. यामध्ये राजघराण्यातील हक्कांचा त्याग करणाऱ्या प्रिन्स हॅरी यांचाही समावेश होता. वडिलांना राजा होताना पाहणं ही त्यांच्यासाठीसुद्धा परवणीच होती. अर्थात त्यांना यावेळी राजघराण्याला मिळणाऱ्या सुविधा तुलनेनं कमीच देण्यात आल्या. त्या क्षणापासून प्रिन्स हॅरी यांच्यावर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या. काहींनी त्यांना सहानुभूतीही दिली. 

इथं ही चर्चा थांबत नाही, तोच एक हादरवणारं वृत्त समोर आलं. ज्यामुळं ब्रिटनच्या राजघराण्यालाही हादरा बसला. काही पॅपराझींनी न्यूयॉर्कमध्ये प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी, मेगन मार्कल यांच्या कारचा पाठलाग केला. साधारण दोन तासांसाठी हे सर्वकाही सुरु होतं. इतकंच काय, या प्रसंगी तर पायी चालणाऱ्या वाटसरुंना कारडी धडक बसण्याची शक्यताही होती. बुधवारी, प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यांकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली. (prince harry and wife meghan markle faced catastrophic car chase in new york )

... तर मोठं संकट आलं असतं 

न्यूयॉर्कमध्ये ड्यूक अँड डचेस ऑफ ससेक्स यांच्यासाठी एका पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथून ते आणखी एका कार्यक्रमासाठी गेले जिथं मेगनची आईसुद्धा होती. prince harry and meghan यांच्या कारचा अतिशय वाईट पद्धतीनं पाठलाग करण्यात येत होता. त्यामुळं या घटनेला गंभीर वळणही मिळू शकलं असतं. जवळपास दोन तासांहून अधिक वेळासाठी त्यांची कार रस्त्यावरच होते. 2020 पासूनच प्रिन्स हॅरी यानी राजघराण्याशी संबंधीत आपल्या पदांचा त्याग केला आणि ते अमेरिकेला गेले होते. असं असलं तरीही त्यांना आजही तितकाच मान चाहते आणि ब्रिटनच्या नागरिकांकडून दिला जातो. 

हेसुद्धा वाचा : रॉयल एनफिल्डची Super Meteor 650 खरेदी करण्यापूर्वी तिचे चांगले- Challanging गुण पाहून घ्या

 

प्रिन्सेस डायनासोबतही हेच झालं होतं... 

1997 मध्ये प्रिन्स हॅरी यांची आणि प्रिन्सेस डायना यांच्याही कारचा पॅपराझींनी असाच पाठलाग केला होता. यावेळी त्या कारमध्ये जवळचा मित्र डोडी फयादसोबत होत्या. यादरम्यानच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि या अपघातातच प्रिन्सेस डायना यांचं निधन झालं. प्रिन्स हॅरी यांच्यासोबत घडलेला प्रकार जगासमोर आला तेव्हा अनेकांनाच गतकाळातील तो काळा दिवस आठवला.