रोम : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. अद्यापही कोरोनाचा धोका काही टळलेला नासताना, कोरोना व्हायरसचे साईड ईफेक्ट समोर येत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत संपूर्ण जगात अनेकांचा मत्यू झाला. आता देखील कित्येक रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान, इटलीताल एका महिलेला कोरोनामुळे चक्क हाताची बोटं कापण्याची वेळ आली. कोरोना संसर्गामुळे संबंधीत महिलेच्या बोटांना गॅंगरीनची लागण झाली. महिलेची बोटं पूर्ण काळी पडल्यामुळे अखेर बोट कापावी लागली.
रक्त गाठल्यामुळे महिलेच्या हातांची बोट कापल्याशिवाय इतर कोणताही पर्याय शिल्लक नव्हता असं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलं आहे. या महिलेचं वय 86 असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ही महिला कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडली होती.
The list of mysterious symptoms related to the coronavirus keeps getting longer.
The latest unexpected side effect happened to an 86-year-old woman in Italy, whose fingers turned black with gangrene as COVID-19 caused severe clotting, cutting off thehttps://t.co/HgWM4UTfhO pic.twitter.com/pnPtcMr3ep
— CHARLES IGBINIDU (@CFOPUBREL) February 13, 2021
युरोपियन जर्नल ऑफ व्हस्क्युलर अँड एंडोव्हस्क्युलर सर्जरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे महिलेला साईट ईफेक्ट झाले. कोरोनामुळे होणारा गॅंगरीन आजार अतिशय गंभीर आहे. या व्यतिरिक्त कोरोनामुऴे होणारे साईड ईफेक्ट याआधी देखील समोर आले आहेत.
दरम्यान देशात त्याचप्रमाणे संपूर्ण जगात कोरोना रूग्नांची संख्या मंदावत असली तरी गाफिल राहू नका असं आवाहन वैज्ञानिकांकडून करण्यात येत आहे. कोरोना साथीवर मात केलेल्या न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा नवा स्टेन सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अधिक काळजी घेण्यात येत आहे.