Ukraine vs Russia Fight Video: गेल्या दीड वर्षापासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने युद्ध नको बुद्ध हवा, असा सल्ला सर्वजण देत असतात. मात्र, हा सल्ला कोणीतरी रशिया आणि युक्रेनला (Ukraine Russia War) देणं गरजेचं आहे. कोणतेही युद्ध रोखण्यासाठी राजनैतिक चर्चा महत्त्वाची असते. दोन्ही देशांमधील मुत्सद्देगिरी शांतता प्रस्तापित करण्यासाठी मोलाची ठरते. अशातच एक धक्कादायक घटना तुर्कीमध्ये सुरू असलेल्या शिखर परिषदेदरम्यान पहायला मिळाली.
तुर्कीमध्ये सुरू असलेल्या शिखर परिषदेदरम्यान, एका रशियन राजनैतिकाने युक्रेनचा ध्वज हिसकावला. ब्लॅक सी इकॉनॉमिक कोऑपरेशन पार्लमेंटरी असेंब्ली (PABSEC) दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मंचावर दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय चर्चेला उधाण आलं आहे.
रशियन शिष्टमंडळातील सदस्य ओल्गा टिमोफीवा मुलाखत देत होत्या. यादरम्यान युक्रेनचे खासदार ओलेक्सँडर मारिकोव्स्की त्यांच्या मागे उभे राहिले आणि त्यांनी युक्रेनचा ध्वज फडकावण्यास सुरुवात केली. हे पाहिल्यानंतर रशियन शिष्टमंडळातील आणखी एक सदस्य व्हॅलेरी स्टॅवित्स्की यांनी युक्रेनच्या खासदाराच्या हातातून ध्वज काढून घेतला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, युक्रेनचे खासदार रशियन शिष्टमंडळातील सदस्याला मारहाण करताना दिसतोय. अलेक्झांडर मारिकोव्स्की यांनी हा व्हिडिओ त्याच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे. रशियन सदस्य परिषदेत बोलत असतानाही तिच्या मागे युक्रेनचा ध्वज उंचावला होता, त्यामुळे संताप अनावर झाला आणि ध्वज हिसकावून घेतला.
In Ankara , during the events of the Parliamentary Assembly of the Black Sea Economic Community, the representative of Russia tore the flag of Ukraine from the hands of a Member of Parliament.
The MP then punched the Russian in the face. pic.twitter.com/zUM8oK4IyN
— Jason Jay Smart (@officejjsmart) May 4, 2023
दरम्यान, काल रशियाच्या राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्यावर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच आता ब्लॅक सी इकॉनॉमिक कोऑपरेशन पार्लमेंटरी असेंब्लीमध्ये ही घटना घडल्याने सर्वच देशांनी नाराजी व्यक्त केली आहे.