Viral Video : ...अन् घसाच कोरडा पडला, मोठा मासा पकडण्याच्या नादात गळाला लागला चक्क देवमासा!

Whale Fish Video : समुद्रात असणाऱ्या अनेक जीवांविषयी आपल्याला कायमच कुतूहल वाटलं आहे. किंबहुना त्या प्रचंड विश्वात नेमकं काय सुरुये हेच आपण विविध मार्गांनी जाणून घेत असतो...   

सायली पाटील | Updated: Oct 10, 2023, 11:15 AM IST
Viral Video : ...अन् घसाच कोरडा पडला, मोठा मासा पकडण्याच्या नादात गळाला लागला चक्क देवमासा! title=
US boat almost gets hit by a massive and aggresive whale video goes viral

Viral Video : सोशल मीडियावर कोणतंही माध्यम सुरु केलं, की तिथं नकळतच आपण बराच वेळ रेंगाळत राहतो. अमुक एक व्हिडीओ, तमुक एक फोटो, मीम्स, जीफ, कॅप्शन, रील्स, शॉर्ट्स अशा बहुविध गोष्टी पाहताना इतका वेळ कसा निघून जातो हे आपल्या लक्षातच येत नाही. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अचंबित करणारे प्रकारही समोर येतात आणि त्यावर नेमकं व्यक्त तरी कसं व्हावं हेसुद्धा आपल्या लक्षात येत नाही. 

सध्या काहीसं असंच अनेक नेटकऱ्यांचं होत आहे. कारण, सोशल मीडिया फीड स्क्रोल करता करता एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहताना अनेकजण दचकल्यामुळं त्यांच्या हातातून फोनही खाली पडला आहे. आता तुम्ही म्हणाल असं आहे तरी काय या व्हिडीओमध्ये? 

या व्हिडीओमध्ये दिसणारी दृश्य कल्पनेच्याही पलीकडची आहेत. विचारही केलेला नसताना आपल्या समोर चक्क मृत्यूच उभा राहतो आणि अर्ध्या सेकंदाहून कमी काळात संपूर्ण आयुष्य डोळ्यापुढं येतं. हा अनुभव नेमका काय असतो हेच व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. अमेरिकन अँगलर झॅक पिलर यानं या व्हिडीओ शेअर केला आहे. (US boat almost gets hit by a massive and aggresive whale video goes viral )

हेसुद्धा वाचा : जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल

 

पोस्ट करताक्षणीच हा व्हिडीओ इतका तूफान व्हायरल झाला की त्यावर विश्वासच ठेवणं कठीण. व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार पिलर बोटीवरून समुद्रात गळ टाकून मासे पकडण्याच्या प्रयत्नांत असल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या काही क्षणांमध्येच असंख्य मासे त्याच्या बोटीच्या दिशेनं आले, जणू त्याला माशांचीच लॉटरी लागली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zach Piller (@zachpiller18)

खरा धोका तर पुढेच होता. कारण, पाण्यातून माशांची लाट उसळण्यामागं कारण होतं एक महाकाय देवमासा. अजिबातच कल्पना नसताना अतिप्रचंड मोठ्या आकाराच्या देवमाशानं पाण्यातून बाहेर सूर मारता आणि तिथं मोठाल्या लाटा फेसाळल्या. बोट हलू लागली. काही कळायच्या आतच देवमासा पुन्हा पाण्यात गेला. पण, या क्षणांमध्ये पिलरला देव, गॉड, अल्लाह, येशू हे आणि असे सगळेच देव आठवले. त्यानं किंकाळ्या फोडल्या. जीवाच्या आकांतानं तो ओरडू लागला. कारण, एका देवमाशानं त्याला मृत्यूच दाखवला होता.