मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर ते आता पुन्हा आपल्या मुंबईच्या घरी परतले आहेत. सोमवारी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी ते दिल्लीत असताना त्यांची तब्येत बिघडल्याने दिल्लीतल्या एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. एका सिनेमाच्या चित्रिकरणाचं काम दिल्लीत सुरु असताना प्रदुषणामुळे त्यांना संसर्ग झाला आणि त्यांची प्रकृती खालावली अशी माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी आपली काळजी करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानलेत.
Dear family,friends,foes and followers. I have been overwhelmed by all your concern about my health.Thank you. I have been filming in Delhi past 18 days and because of the Pollution and my low count of neutrophils, I caught an infection whereby I had to be hospitalized. .....
— Rishi Kapoor (@chintskap) February 4, 2020
रविवारी ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू कपूर देखील रूग्णालयात उपस्थित होत्या. ऋषी कपूर यांच्या तब्येतीविषयी माहिती मिळताच त्यांचा मुलगा, अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री आलिया भटट् यांनीसुद्धा थेट रुग्णालय गाठलं.
काही महिन्यांपूर्वीच ऋषी कपूर यांनी कॅन्सरवर मात करत ते परदेशातून परतले होते. बरेच महिने न्यूयॉर्कमध्ये या आजारावर उपचार घेतल्यानंतर ते स्वगृही परतले. यादरम्यान पत्नी नीतू या त्यांच्यासोबतच होत्या. शिवाय रणबीर आणि आलियासुद्धा त्यांची भेट घेण्यासाठी वारंवार जात असत.
आजाराशी झुंज देत पुन्हा एकदा कलाविश्वात अनोख्या अंदाजात परतणारे ऋषी कपूर येत्या काळात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासोबत झळकणार आहेत.