मुंबई : कोरोना व्हायरसची दुसरी लाट ओसरत असली तरी, कोरोनाचं सावटं अद्यापही आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले प्राण गमावले. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना अखेरचा निरोप दिला. कोरोनामुळे बॉलिवूडमध्ये देखील अनेकांचा मृत्यू झाला. अभिनेता शेखर सुमनच्या आईचं कोरोनामुळे निधन झालं आहे. गुरूवारी शेखरच्या आईने अखेरचा श्वास घेतला. खुद्द शेखरने याबद्दल माहिती दिली. शेखर म्हणाला मी स्वतःला निराधार आणि अनाथ समजत आहे.
My belovedMother whom I loved the most in this world left for her heavenly abode yday.i feel orphaned and devastated.Thank you Ma for being there for all of us all the time.i will miss you till my last breath.
Thank you all for your prayers and blessings— Shekhar Suman (@shekharsuman7) June 18, 2021
शेखर ट्विट करत म्हणाला, 'माझी प्रेमळ आई... सर्वात जास्त प्रेम मी माझ्या आईवर प्रेम करत होतो. ती आता स्वर्गात गेली. मी आता स्वतःला अनाथ आणि निराधार समजतं आहे.' आमच्या वेळेनुसार स्वतःचं वेळापत्रक ठरवणारी आमची आई असं म्हणतं शेखरने सोशल मीडियाच्या माध्यमातून आईचे आभार मानले आहेत. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला मिस करेल असं देखील शेखरने ट्विटमध्ये लिहिलं आहे.
दोन दिवसांपूर्वी शेखरने ट्विट करत आईच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले. आईच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर अपडेट दिल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील त्याच्या आईसाठी प्रार्थना केली. तेव्हा शेखरने नेटकऱ्यांचे देखील आभार मानले.