Dipika Kakar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कडनं 'मास्टरशेफ इंडिया'मधून छोट्या पडद्यावर पुन्हा कमबॅक केलं आहे. बऱ्याच काळानंतर तिनं कमबॅक केलं आहे. दीपिका या शोमध्ये तिचे कुकिंग स्किल्स दाखवताना दिसते. ती बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर होती. तरी सुद्धा दीपिका आणि शोएब हे लग्झरी आयुष्य जगत आहेत. ते दोघे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम यांची लाइफस्टाईल ही नेहमीच चर्चेत राहते.
दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम आलिशान घर, महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. शोएब आणि दीपिकानं अनेकदा त्यांच्या आलिशान घराची झलक त्यांच्या व्लॉगमध्ये दाखवली आहे. छोट्या पडद्यापासून दूर राहून दीपिका जवळ कोटींची संपत्ती आहे. शोएब आणि दीपिका दोघंही कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. आज त्यांच्या कार कलेक्शन, दागिने आणि एकूण नेटवर्थविषयी जाणून घेऊया.
शोएब इब्राहिम आणि दीपिका यांचं घर आलिशान आणि खूप मोठं आहे. त्यांनी त्यांच्या घराला खूप सुंदर असं डिझाइन केली आहे. त्यांचं घर हे 5 बीएचकेचं आहे. त्यात त्यांनी खूप सुंदर असं किचन स्पेस तयार केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, दीपिका कक्कडनं त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं BMW X4 कार खरेदी केली होती. त्यानंतर दीपिकानं BMW 6 च्या सीरिजची खरेदी केली. 63.90 लाख रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे मर्सिडीज बेंज देखील आहे.
दीपिका कक्कडनं शोएब इब्राहिमला त्याच्या वाढदिवसानिमित्तानं एक सरप्राइज प्लॅन केलं होतं. इतकंच नाही तर शोएबला लग्झरी ब्रॅंडची 77 हजार रुपयांची स्किन्स गिफ्ट केल्या आहेत. शोएब इब्राहिमनं दीपिका कक्कडच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पर्सनलाइज्ड चांद बाली आणि एक महागडी लुई वुइटन बॅगसोबत अनेक महागड्या आणि आकर्षक गोष्टी भेट केल्या होत्या. दीपिकानं या सगळ्या भेट वस्तू या व्लॉगमध्ये दाखवल्या होत्या.
हेही वाचा : 'आता ताकद नाही'; चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान व्हॅनिटीमध्येच क्रिती सेननला रडू कोसळलं...
शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कड दोघं ही लोकप्रिय कलाकार आहेत. त्या दोघांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 2024 पर्यंत त्यांची एकूण संपत्ती ही 35-40 कोटी असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या कमाईच्या आकड्याविषयी बोलत असाल तर त्यांचे प्रोजेक्ट्स, ब्रॅंड अन्डॉर्समेंट आणि यूट्यूब चॅनलनं होते. शोएब आणि दीपिकानं अनेक कार्यक्रम देखील केले आहेत. रियल स्टेट आणि इतर बिझनेस त्यात सहभागी आहेत.