Adipurush New Poster : प्रभू श्रीराम (Jai Sri Ram), त्यांचा जीवनप्रवास आणि संपूर्ण जीवनप्रवासात त्यांनी जगतापुढे ठेवलेल आदर्श या साऱ्याचा विसर भारतीयांना कधीच पडू शकत नाही. (Ramanand Sagar Ramayan) रामायणाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचदा प्रभू राम आणि त्यांची शिकवण आपल्या भेटीला आली. विविध कलाकारांनी अतिशय समर्पकपणे या पौराणिक कथा तुमच्याआमच्यापर्यंत पोहोचवल्या. यामध्ये (Arun Govil) अरुण गोविल यांनी साकारलेले श्रीराम म्हणजे जणू देवाचं रुपच, अशीच प्रतीमा चाहत्यांमध्ये तयार झाली. पण, सध्या मात्र याच श्रीरामांचं एक वेगळं रुप सिनेरसिकांना पाहायला मिळत आहे. (adipurush movie poster got trolled prabhas kriti sanon as lord ram and sita latest Marathi news )
(South Films ) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आघाडीवर असणारा अभिनेता प्रभास (Prabhas) आगामी 'आदिपुरुष' (Adipurush ) या चित्रपटामध्ये श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन यामध्ये माता सीतेच्या रुपात दिसेल. राम नवमी (ram navami 2023) च्या निमित्तानं या चित्रपटाचं एक नवं पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीला आणलं गेलं. 'मंत्रों से बढ़के तेरा नाम.... जय श्री राम' असं कॅप्शन लिहित प्रभासनं हे पोस्टर शेअर केलं.
चित्रपटाच्या पोस्टरवर रामाच्या रुपात प्रभास, सीतेच्या रुपात क्रिती सेनन, लक्ष्मणाच्या रुपात सनी सिंग आणि रामभक्त हनुमानाच्या रुपात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे झळकत आहे. आपण पुराणकथांमध्ये राम- लक्ष्मण- सीता आणि मारुतीरायाची जी वर्णनं पाहिली, ऐकली त्याच्या बरंच जवळ जाणारं हे पोस्टर. पण, काही सिनेरसिकांना मात्र ते भावलं नाही आणि त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली.
'संस्कृतीच्या नावावर तुम्ही हे काय दाखवताय?' असा प्रश्न एका नेटकऱ्यानं केला, तर कुणी या चित्रपटाच्या टीझरचा संबंध नव्या पोस्टरशी जोडत हा 100 % फ्लॉप चित्रपट असेल असं म्हटलं. लक्ष्मणाच्या शरीरावर चामड्याचं बाहुकवच, श्रीरामांच्या शरीरावरही तशाच पद्धतीचं कवच, VFX चा अती वापर हे सर्वकाही आपल्याला भावलेलं नाही असंही चाहत्यांनी म्हटलं आणि 'आदिपुरुष'कडून आपल्या नेमक्या काय अपेक्षा होत्या याकडेच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचं पुन्हा एकदा लक्ष वळवलं.
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' हा चित्रपट 16 जून 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 3डी फॉरमॅटमध्ये हा चित्रपट पाहून प्रेक्षकांना एक नवा अनुभव देण्याचा निर्माते आणि दिग्दर्शकांचा प्रयत्न असेल. जागतिक स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला आता प्रदर्शनानंतर नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.