Akshay Kumar : गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारनं अनेक बायोपिकमध्ये काम केलं आहे. तर 2018 मध्ये हे सगळं सुरु झालं. त्यात 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पॅडमॅन' पासून आताच्या 'स्काई फोर्स' पर्यंत अनेक चित्रपट आहेत. हे सगळे चित्रपट हे सत्य घटनेवर आधारीत आहेत. अक्षयनं केलेल्या बायोपिक्स काही हिट झाल्या तर काही फ्लॉप झाल्या. दरम्यान, या सगळ्यावर आता अक्षय कुमारनं खुलासा केला आहे की त्यानं हा चित्रपट का निवडला.
'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारनं या चित्रपटाला निवडण्याचं कारण सांगितलं आहे. अक्षय कुमारनं सांगितलं की 'तो असे चित्रपट करतो जे शाळेच्या पुस्तकाचा भाग असायला हवे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पुस्तकांमध्ये नाही. मी मुद्दामून अशा भूमिका करतो ज्या आपल्या चित्रपटाचा भाग नाही. माझी असं काही करण्याची इच्छा आहे. त्या हीरोजला कोणी ओळखत नाही. याविषयी लोकांना काही माहित नसतं, कारण कोणी नक्की काय प्रकरण आहे किंवा त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेत नाही. मी अशा प्रकारच्याच भूमिका निवडतो.'
पुढे अक्षयनं मुलांच्या इतिहासाच्या पुस्तकांविषयी तक्रार केली. त्यांनी सांगितलं, शाळेतील अनेक गोष्टी या ठीक करण्याची गरज आहे. 'आम्ही अकबर किंवा औरंगजेबविषयी तर वाचतो, पण आपल्याच हीरोजविषयी वाचत नाही. त्यामुळे त्यांची माहिती देणं गरजेचं आहे. सेनेच्या अनेक गोष्टी आहेत. अनेकांना परमवीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं आहे. मला वाटतं की इतिहास सुधरवण्याची गरज आहे आणि अशा प्रकारच्या नेत्यांना समोर आणायला हवं आणि आपल्या पिढ्यांना सांगायला हवं.'
हेही वाचा : 'छावा' पाहायला जाण्याआधी लक्ष्मण उतेकरांचे 'हे' चित्रपट पाहाच
संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूरनं 'स्काई फोर्स' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर या चित्रपटात 'स्काई फोर्स' मध्ये सारा अली खान आणि निम्रत कौर देखील आहे. 'स्काई फोर्स' विषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट 1965 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या हवाई युद्धात पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारतानं केलेल्या प्रतिहल्ल्याच्या कथेवर हे आधारित आहे. या चित्रपटात अक्षय विंग कमांडर केओ अजुहा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वीर पहाडिया देखील या चित्रपटातून पदार्पण करत आहेत.