Ranbir Kapoor And Tripti Dimri viral video : शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाने पडद्यावर दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी रणबीर कपूरच्या चित्रपटाने ग्रँड ओपनिंग करत देशभरात 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेलरवरुन हा वडील आणि मुलाच्या नात्यावरीच चित्रपट असेल असेच वाटत होतं. त्यानंतर चित्रपटातील हुआ मैं या गाण्याने चाहत्यांना रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांची लव्हस्टोरी असेल असेही वाटलं होतं. मात्र चित्रपटातील एका सीनने सर्वानाच आश्चर्यचकित केलं आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटातील तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरचा एक सीन सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रणबीर-तृप्ती रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. रश्मिका आणि रणबीरचा त्यांच्या खोलीतील एका क्षणाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता रणबीर आणि तृप्ती डिमरी यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रणबीर कपूरसोबत तृप्तीने या चित्रपटात एक रोमँटिक व्यक्तिरेखा साकारली आहे. व्हिडिओमध्ये रणबीर कपूर अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी तृप्ती सिनेमात नग्न अवस्थेत दिसत आहे. रणबीर तृप्तीच्या पोटावर डोके ठेवून विसावलेला दिसतो. तृप्ती आणि रणबीरच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर यूजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण त्याची प्रशंसा करत आहेत, तर काहींना त्यावर नापसंती व्यक्त केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने अॅनिमल चित्रपटाला A प्रमाणपत्र दिले होते. तसेच दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना पाच बदल करण्यास सांगितले होते.
Tripti dimri
Animal will be the most polarized film of the year just because of the scenes
Some scenes will not go down well with some people
Don't dare to watch with family#abhiya #Animal pic.twitter.com/gdgskSTnv8
— Tanish Singh (@tanishsingh0508) December 1, 2023
दरम्यान, रणबीर कपूरसोबतच रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल अॅनिमलमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहेत. अॅनिमलचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले असून हा चित्रपट हिंदी तसेच तेलुगू, मल्याळम, तामिळ आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. Sacknilk ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 61 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने हिंदीमध्ये केवळ 50.5 कोटी, तेलगूमध्ये 10 कोटी, तामिळनाडूमध्ये 0.4 कोटी, कर्नाटकमध्ये 0.09 कोटी आणि मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपये कमावले आहेत.