आलिया नंतर आता आणखी एका अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म, दुसऱ्यांदा झाली आई

rucha hasabnis become mother again : अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे.

Updated: Nov 8, 2022, 12:17 AM IST
आलिया नंतर आता आणखी एका अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म, दुसऱ्यांदा झाली आई title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची चर्चा आहे. कारण दोघेही आता आई-वडील झाले आहेत. आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांकडून ही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आलिया प्रेग्नेंट असल्यापासून ती चर्चेत होती. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री आलिया भट्टनंतर आणखी एक अभिनेत्री आई झाली आहे. टीव्ही शो 'साथ निभाना साथिया' ची अभिनेत्री रुचा हसबनीस (rucha hasabnis baby boy) हिने मुलाला जन्म दिलाय.  रुचा दुसऱ्यांदा आई झाली आहे. रुचाने इंस्टा पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

रुचाने (rucha hasabnis) नवजात बाळाच्या पायाचा गोंडस फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिलीये. तिचे देखील सोशल मीडियावर अभिनंदन केले जात आहे. रुचा ही स्टार प्लसच्या साथ निभाना साथिया या मालिकेत दिसली होती. या शोमध्ये तिने राशीची भूमिका साकारली होती. रुचाने लग्नानंतर ब्रेक घेतला आहे.

रुचाने 2015 मध्ये बिझनेसमन राहुल जगदाळेशी लग्न केले. 2019 मध्ये या जोडप्याला मुलगी झाली. तिचे रुही आहे. रुचा तिच्या घरच्यांमध्ये व्यस्त आहे. रुचा हसबनीस स्पॉटलाइटपासून दूर राहते. मात्र ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.