मुंबई : क्रुझमधील रेव्ह पार्टीमध्ये समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणामुळे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आठ जणांना आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे बॉलिवूडचा किंग खान अर्थातचं शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या आर्यनची सतत चौकशी केली जात आहे, ज्यामध्ये त्याने ड्रग्स घेण्याचे कबूल केले आणि हेही सांगितले की तो जवळपास 4 वर्षांपासून ड्रग्स घेत आहे.
ड्रग्सच्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. दिवसागणिक आर्यन ड्रग्स प्रकरणात अधिक अडकत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अत्यंत खाजगी जीवन जगण्यात विश्वास ठेवतो आणि स्वतःला स्पॉटलाइटपासून दूर ठेवतो. पण कोणत्या तरी कारणामुळे तो चर्चेत येतो आणि वादाच्या भोवऱ्यात अडकतो.
ड्रग्स प्रकरणात अडकण्यापूर्वी आर्यनचा एक MMS व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये एक मुलगा कारमध्ये एका मुलीसोबत इंटिमेट झाल्याचं दिसून आलं होतं. तेव्हा हा आर्यन खान असल्याची चर्चा रंगली होती. पण अखेर व्हायरल झालेला व्हिडिओ फेक असल्याचं समोर आलं. MMS प्रकरणानंतर आर्यन त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला.
आतापर्यंत अनेक मुलींच्या नावापुढे आर्यनचं नाव जोडण्यात आलं आहे. आर्यन एका रोमानियन मुलीला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. आर्यनच्या मिस्ट्री गर्लसोबतच्या नातेसंबंधावर अनेक वादही झाले. पण यासर्व फक्त अफवा असल्याचं सांगत शाहरुखने रंगणाऱ्या चर्चांना पुर्ण विराम दिला.