मुंबई : कधीही कॉमेडियनची चर्चा होते तेव्हा भारती सिंह (Bharti Singh)चं नाव आवर्जून घेतलं जातं. भारती सिंह गरोदर आहे. सध्या ती तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. मात्र गरोदर असूनही तिने कामात खंड घेतलेला नाही. लवकरच ती गोंडस बाळाला जन्म देणार आहे. तिने आपल्या डिलिव्हरी डेटचा देखील खुलासा केला आहे. कॉमेडिअनच्या डिलिवरी डेटबाबत चाहत्यांना देखील खूप उत्सुकता आहे.
लोकप्रिय कॉमेडिअन भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचियाने गेल्यावर्षी सोशल मीडियावर आपल्या घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याची घोषणा केली. (ResultsOnZee | उत्तरप्रदेशात भाजप राखणार का गड? पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर निवडणूकांचा आज निकाल)
भारती सिंहने ही गोड बातमी शेअर करताना तिचा खास अनुभव देखील शेअर केला. हा प्रवास किती खडतर होता याची माहिती दिली.
भारती सिंह लवकरच म्हणजे एप्रिल महिन्यात आपल्या बाळाला जन्म देणार आहे. तिच्या येणाऱ्या बाळासाठी सगळेच उत्सुक आहेत. (UP Election Results 2022 Live updates | भाजपची मुसंडी; 50.पेक्षा अधिक जागांवर आघाडी निकालाचे LIVE UPDATE)
भारती पापाराझीशी बोलताना सांगते की, तुम्ही कधीपण मामा होऊ शकतात. एप्रिल महिन्यात बाळाचा जन्म होणार आहे.
भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचियाने एप्रिलमध्ये बाळाचा जन्म होणार असल्याचं म्हटलं आहे. भारतीने आपल्या यूट्यूब चॅनल एलओएल लाइफ ऑफ लिंबाचियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. (निकालापूर्वीच 'आप'ची 'जिलेबी', पक्ष कार्यालयाबाहेरील 'या' बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष )
या अगोदर भारतीने एका मुलाखतीत सांगितलं की, ती नॉर्मल डिलिव्हरीकरता प्रयत्न करत आहे. ती सिझेरिअनला प्रचंड घाबरते. तिने ऐकलंय की, त्यानंतर खूप त्रास होतो. मला सतत काम करायचं आहे. त्यामुळे मी खूप मेहनत करत असून डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या सुचनांच पालन करत आहे.