Fact Check Deepika Padukone Ranveer Singh Baby Girl First Photo : गणेश चतुर्थी दुसऱ्या दिवशी 8 सप्टेंबर रविवारी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी चिमुकलीच आगमन झालंय. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल दीपिका गणेश चतुर्थीच्या दिवशी शनिवारी (7 सप्टेंबर 2024) संध्याकाळी अॅडमिट झाली होती. त्यापूर्वी होणारे आई-बाबा शुक्रवारी (6 सप्टेंबर 2024) सिद्धीविनायक मंदिरात जाऊन बाप्पाच दर्शन घेतलं होतं.
रणवीरने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर बॉलिवूडपासून चाहत्यांपर्यंत सगळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आता दीपिका रणवीरची लेक नेमकी कोणासारखी दिसते, तिचा चेहरा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच सोशल मीडियावर दीपिका रणवीरच्या लेकीचा हॉस्पिटलमधील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. दीपिका आणि बाळाचा फोटो पाहून चाहते आनंदाने बहरले आहेत. पण हा फोटो कितपत खरा आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. नेटकऱ्यांना दीपिका आणि बाळाचा हा फोटो खरा वाटतोय. नेटकरी हा फोटो पाहून बाळ आईवर गेलंय की वडिलांवर याची चर्चा करताना दिसतं आहेत.
पण आम्ही तुम्हाला या फोटोमागील सत्य सांगणार आहोत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो AI ने जनरेट केलाय. खरं तर गूगलवर Ranveer Singh Deepika Padukone Baby Girl Photo असं टाकल्यास तुम्हाला अनेक फेक फोटो दिसतील. तसाच हा फोटोही फेक आहे. या फोटोमधील बाळ आणि हा फोटो दीपिकाचा नाही.
तुम्हाला गूगलवर AI ने जनरेट केलेल अनेक फोटो मिळतील. दीपिका आणि रणवीर यांनी गोड बातमी दिल्यानंतर चाहते बाळाचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एवढंच नाही तर गुगलवर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे लहानपणीचे फोटोदेखील मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहेत.
या फोटोवरून बाळा नक्की कोणासारखं दिसतं याचा अंदाज चाहते घेत आहे. खरं तर सेलिब्रिटी आपल्या मुलांचे चेहरे लगेचच जगासमोर येऊ देत नाहीत. अनुष्का शर्माने आपल्या दोन्ही मुलांचे चेहरे कधीच दाखवत नाहीत. तर आलिया आणि रणबीर कपूर यांनी क्रिसमेसच्या मुहूर्तावर राहा एक वर्षांची झाल्यानंतर तिला पापराजी समोर आणलं होतं. त्यामुळे आता दीपिका आणि रणवीर त्यांचा लेकीचा चेहरा कधी दाखवणार हे पाहवं लागणार आहे.