Dharmaveer Movie Mangesh Desai: 2022 साली आलेला 'धर्मवीर' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आता या चित्रपटाचा नवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्यामुळे या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी या चित्रपटातून पुढे काय पाहायला मिळणार आहे. याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे काम हे सर्वांनाच प्रेरणा देणार आहे. त्यांनी अनेकांची निस्वार्थीपणानं सेवा केली आहे. आज त्यांना जाऊन 22 वर्षे होत आली असली तरीसुद्धा त्यांचे काम आणि ते लोकांच्या कायमच लक्षात राहणार आहे यात काहीच शंका नाही. या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी आपण आनंद दिघे यांची भुमिका करणार होता परंतु काही कारणास्तव ही भुमिका ते करू शकले नाहीत, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावर ते काय म्हणाले हे या लेखातून जाणून घेऊया.
अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या युट्युब चॅनलच्या मुलाखतीत सांगितलं आहे की, ''माझ्या स्क्रीन टेस्ट झाल्या. 2014, 2017, 2019 काळात स्क्रीन टेस्टबरोबर, लूक टेस्टसुद्धा केली. मी दिघे साहेबांसारखा दिसत होतो. मी प्रवीण तरडेनं सांगितलं, ‘दिघे साहेबांची तूच भूमिका कर.’ तेव्हा मी म्हणालो, मीच दिघेसाहेबांची भूमिका करणार आहे. मग मी प्रयत्न सुरू केले.”
पण त्यावेळेस मी कुठल्याच अँगलनं दिघेसाहेबांसारखा दिसत नव्हतो. मी शिंदे साहेबांना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) यांना माझा लुक दाखवला, ते म्हणाले, ‘नाही रे, तू दिघे साहेबांसारखा दिसत नाहीयेस.’ साहेबांचे स्वीय सहाय्यक सचिन जोशी सर म्हणून होते; तेही म्हणाले, ‘नाही, तू तसा दिसतच नाहीयेस.’ त्यानंतर आता काय करूया? असा प्रश्न निर्माण झाला होता. प्रवीण म्हणाला, ‘तू कर, तू उलट मारून नेशील रे, उन्नीस बीस चालतं.’ मी शांतपणे राहून विचार केला; उद्या जर चित्रपट प्रदर्शित झाला आणि म्हणाले, अप्रतिम चित्रपट होता. प्रवीणने उत्तम काम केलं. चित्रपट छान होता पण दिघे साहेबांसारखा मंगेश दिसला नाही. थोडसं दुसऱ्याला कोणाला तरी निवडायला पाहिजे होतं.”, असे ते म्हणाले.
मी मनात म्हटलं, 2013 पासूनचा माझा सगळा प्रयत्न फसेल. कुठल्याही पद्धतीनं त्या चित्रपटाला गालबोट लागायला नको. मी दुसऱ्या दिवशी आलो आणि प्रवीणला म्हटलं, मी नाही करत. प्रवीण म्हणाला, ‘तू वेडा आहेस, तू कर, असा काय करतो?’ मी म्हटलं, मी नाही करत. आपण नवा नट शोधू या आणि मग पुन्हा दिघे साहेबांच्या भूमिकेसाठी नटाच्या शोधाची सुरुवात झाली. तोपर्यंत चित्रपटाचं शेड्यूल लागलं होतं. स्टारकास्ट ठरली होती. सगळं झालं होतं. लोकेशन्स ठरली होती. लोकेशनवर सेट बांधायला घेतला होता, पण दिघेसाहेबांच्या भूमिकेसाठी कोणी मिळाले नव्हते. मग प्रसादची निवड झाली,”, असे ते यावेळी म्हणाले.