मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एम्बर हर्ड यांच्या अब्रुनुकसानीचा दावा असणाऱ्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला होता. एम्बर हर्ड आणि एलन मस्क यांच्या रिलेशनशिपवर यानिमित्तानं उजेड टाकण्यात आला होता. जिथं लिफ्टमधील त्यांचा प्रायव्हेट व्हिडीओ सर्वांनाच धक्का देऊन गेला.
Amber Heard शी असणारं नातं एलननं कधीच जाहिररित्या स्वीकारलं नसलं तरीही त्यांच्या नात्याला नकळतच एम्बरनं दुजोरा दिला होता.
एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिनं एलनसोबतच्या नात्याची द्वाही दिली. जॉनी आणि एम्बरच्या वादात नकळतच गेल्या काही दिवसांपासून एलनचंही नाव ओढलं गेलं.
किंबहुना एक प्रायव्हेट व्हिडीओही समोर आला, पण एलननं तेव्हाही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत नाव असणाऱ्या मस्कनं सदर प्रकरणी त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
I hope they both move on. At their best, they are each incredible.
— Elon Musk (@elonmusk) May 28, 2022
Johnny Depp- Amber Heard trial वर वक्तव्य करणाऱ्या एका ट्विटला एलननं उत्तर देत इथं पहिल्यांदाच त्याची बाजू समोर आली. 'मी आशा करतो, की ते दोघंही आता या मुद्द्याला मागे टाकून पुढे जातील. त्यांच्यासाठी हेच योग्य असेल, आपआपल्या मार्गानं ते दोघंही कमाल आहेत', असं त्यानं लिहिलं.
एलनच्या या ट्विटनंतर जॉनी- एम्बर प्रकरणाला नवं वळण मिळालं. नव्या चर्चांना उधाण आलं, त्या चर्चा होत्या एम्बर - जॉनी आणि एलनच्या नात्यांत असणाऱ्या गुंतागुंतीच्या.