पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट; अभिनेता तातडीनं दुसऱ्यांदा विवाहबंधनात, VIRAL PHOTO मुळे चाहतेही हैराण

South Actor : दाक्षिणात्य अभिनेत्यानं पत्नीला घटस्फोट दिल्याच्या काही आठवड्यात केलं दुसरं लग्न

दिक्षा पाटील | Updated: Oct 4, 2024, 12:40 PM IST
पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट; अभिनेता तातडीनं दुसऱ्यांदा विवाहबंधनात, VIRAL PHOTO मुळे चाहतेही हैराण  title=
(Photo Credit : Social Media)

South Actor : 'पोन्नियिन सेलवन' फेम दाक्षिणात्य अभिनेता जयम रवी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यानं त्याची पत्नी आरतीसोबतचा 15 वर्षांचा सुखी संसार मोडला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेतल्याची बातमी त्यानं चाहत्यांना दिली. एकीकडे जयम रवी आणि त्याची पत्नी एकमेकांवर अनेक आरोप करत आहेत. तर दुसरीकडे त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की त्याच्या आणि आरतीच्या लग्नाचे हे फोटो आहेत. मात्र, जयम रवी आणि प्रियांका मोहनच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला. 

जयम रवीच्या चाहत्यांना त्याचे  हे फोटो पाहून विश्वास बसत नाही की रवीनं खरंच लग्न केलं आहे? या व्हायरल फोटोचं सत्य काय आहे ते आज आपण जाणून घेऊया... जयम रवीनं काही आठवड्यांपूर्वी पत्नी आरतीसोबत घटस्फोटाची घोषणा केली आहे आणि त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की त्या लग्नात त्याचा श्वास अडकत होता. तर काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की जयम रवीचं गायिका केनिशा फ्रांसिससोबत अफेयर सुरु होतं आणि त्यामुळे त्याचं लग्न मोडलं. मात्र, दोघांनी हे खोटं असल्याचं म्हटलं आणि आता जयम रवी आणि प्रियांका मोहनच्या लग्नाच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

दरम्यान, जयम रवी आणि प्रियांका मोहननं लग्न केलेलं नाही. हे व्हायरल होत असलेले त्यांचे फोटो हे एका चित्रपटातील शूटचे आहेत. या चित्रपटाचं नाव 'ब्रदर' असं आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे हे फोटो आहेत. 31 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जयम रवी आणि प्रियांका मोहनशिवाय भूमिका चावला, योगी बाबू, रोबो शंकर, Saranya Ponvannan आणि सीता सारखे कलाकार आहेत. 

जयम रवीनं नुकतीच वडिलांविरोधात चेन्नईच्या अड्यार पोलिस ठाण्यात एफआयआर तक्रार दाखल केली. त्यावेळी जयम रवीनं आरोप केला की त्याच्या पत्नीनं त्याला घरातून हकलवून लावलं. तर दुसरीकडे आरतीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की जयम रवीनं घटस्फोट आणि विभक्त होण्याविषयी तिला काही सांगितलं नाही, तर जयम रवीनं हे खोटं असल्याचं सांगितलं. 

हेही वाचा : 'ही तुमच्या प्रार्थनांची... ', मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट

जयम रवीनं उत्तर देत सांगितलं की घटस्फोटाची घोषणा करण्याच्या खूप आधी पासून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरु होती. मात्र, त्याला सगळ्यांसमोर अर्थात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाच्या बातमीची घोषणा करावी लागली कारण त्याच्या विरोधात अनेक अफवा पसरत होत्या.