प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या आईचं निधन; पोस्ट शेअर करत दिली माहिती

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांच्या आईचं आज सकाळी निधन झालं. 

Updated: Jun 14, 2022, 05:48 PM IST
प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या आईचं निधन; पोस्ट शेअर करत दिली माहिती title=

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा यांच्या आईचं आज सकाळी निधन झालं. ही माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. ही माहिती देत ते खूप भावूक झाले आहेत आणि त्यांना खूप एकटं वाटत आहे.   

सुधीर मिश्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिलं की, 'माझ्या आईचं तासाभरापूर्वी निधन झालं. ती आम्हाला कायमची सोडून गेली. आईच्या मृत्यूच्या वेळी मी आणि माझी बहीण तिच्यासोबत होतो. मी आता अनाथ झालो आहे.

बॉलिवूड स्टार्सनी वाहिली श्रद्धांजली
नुकतीच सुधीर मिश्रा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या या ट्विटनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली असून त्यांचं सांत्वन केलं आहे. आयुष्मान खुराना, अमृता राव ते मनोज बाजपेयी, फरहान अख्तर यांसारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिव्यांका त्रिपाठीसारख्या अनेक टीव्ही सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला आहे.

सुधीर मिश्रा यांच्या ट्विटवर मनोज बाजपेयींनी लिहिलं आहे की, 'तुम्हाला या कठीण काळातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.'' त्याचवेळी आयुष्मानने ट्विट केलं आहे की, 'कृपया काळजी घ्या. माझ्या मनापासून सहानुभूती तुमच्यासोबत आहे. तुमची आई जिथे असेल तिथे आनंदी राहो.