शाहरुखच्या 'हॅरी मेट सेजल'चा टिझर प्रदर्शित

किंग खान शाहरुख आणि अनुष्का स्टारर जब हॅरी मेट सेजल या सिनेमाची सध्या जोरदार हवा आहे.

Updated: Jun 20, 2017, 10:29 PM IST
शाहरुखच्या 'हॅरी मेट सेजल'चा टिझर प्रदर्शित

मुंबई : किंग खान शाहरुख आणि अनुष्का स्टारर जब हॅरी मेट सेजल या सिनेमाची सध्या जोरदार हवा आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमात शाहरुख आणि अनुष्का ही जोडी तिस-यांदा एकत्र झळकणार आहेत. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून किंग खान आणि अनुष्काची अफलातुन केमिस्ट्री टिझरमध्ये दिसते आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनला शाहरुख खाननं सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान अहमदाबादला जाऊन सेजल नावाच्या सगळ्या महिलांना भेटणार आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा सेजल पारीख या गुजराती मुलीच्या भूमिकेत दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

पाहा 'हॅरी मेट सेजल'चा टिझर