अखेर 'हेरा फेरी 3' येणार! पण, इतका उशीर का झाला? निर्मात्याला का मोजावे लागले 60 कोटी?

Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' येणार मात्र त्यासाठी निर्मात्याला मोजावे लागेल 60 कोटी, जाणून घ्या कारण...

दिक्षा पाटील | Updated: Oct 12, 2024, 11:15 AM IST
अखेर 'हेरा फेरी 3' येणार! पण, इतका उशीर का झाला? निर्मात्याला का मोजावे लागले 60 कोटी? title=
(Photo Credit : Amazon Prime Video)

Hera Pheri 3 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा 'हेरा फेरी' हा फ्रेंचायझीचे आता पर्यंत दोन भागात प्रदर्शित झाले आहेत आणि त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. 'हेरा फेरी 3' कडून प्रेक्षकांना खूप जास्त आशा आहेत त्यासोबत या गोष्टीवर विश्वास देखील आहे की जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल. तर एकीकडे हा चित्रपट बंद होण्याची चर्चा होती, तर दुसरीकडे आता या चित्रपटाला हिरवा झेंडा मिळाला आहे. 

गेल्या वर्षी 2023 मध्ये तिन्ही कलाकारांनी या विषयी सांगितलं होतं की या चित्रपटावर लवकरच काम सुरु होणार आहे. मात्र, फ्रेंचायझी संबंधीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. पण आता चित्रपट करण्यासाठी असलेले सगळे मार्ग मोकळे झाले आहेत. पण आता चित्रपटांसाठी फिरोज नाडियाडवाला यांनी सगळ्या कायदेशीर अडचणीतून स्वत: ला बाहेर काढलं आहे.

फिरोज नाडियाडवाला यांनी 'हेरा फेरी' शिवाय 'आवारा पागल दीवाना', 'फिर हेरा फेरी', 'वेलकम' सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच 'वेलकम टू जंगल' या चित्रपटाची घोषणा केली आणि अक्षयसोबत इतर बड्या कलाकारांच्या टीमसोबत चित्रपटावर काम सुरु केलं आहे. असं म्हटलं जातंय की 'फिर हेरा फेरी' चा प्रोमो देखील शूट झाला होता. पण फिरोज आणि इरोस यांच्यात असलेल्या कायदेशीर अडचणींमुळे त्याला प्रदर्शित करता आलं नाही. त्यांनी जेव्हा Hera Pheri 3 ला बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरोसनं फिरोजला लीगल नोटिस पाठवली आणि सांगितलं की जोपर्यंत उरलेले 60 कोटींचं पेमेंट होत नाही, तोपर्यंत चित्रपटाचे राइट्स कंपनी जवळच राहणार. 

हेही वाचा : कोकण हार्टेड गर्लला सापडला आयुष्यभराचा जोडीदार; दसऱ्याच्या दिवशी दिली गुड न्यूज! म्हणाली, 'तुझी सहचारिणी...'

'पिंकव्हिला' च्या रिपोर्टनुसार, फिरोज नाडियाडवाला यांनी कंपनीला संपूर्ण पेमेंट केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाला करण्याच्या परवानगीशिवाय दुसऱ्या चित्रपटांचे अधिकार देखील त्यांच्याकडे आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, कोईमोईनं सांगितलं की फिरोज यांनी सगळी पेंडिंग पेमेंट हे क्लियर केले आहेत आणि हेरा फेरीसोबत इतर चित्रपटांसाठी न्यायालयाकडून नो ड्यू सर्टिफिकेट मिळवलं आहे. आता ते त्यांच्या इच्छेनुसार, चित्रपट बनवण्यासाठी सज्ज आहेत. रिपोर्ट्सनुसार, 'हेरा फेरी 3' मध्ये अक्षय कुमारशिवाय सुनील शेट्टी आणि परेश रावल देखील या चित्रपटात दिसणार आहेत.