मुंबई : १९ व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकेडमी (आयफा) अवॉर्ड्सला सुरुवात झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स बॅंकॉकला रवाना झाले आहेत. येथे रेड कार्पेटवर बॉलिवूड स्टार्सने आपला जलवा दाखवला. तर स्टेजवर बॉलिवूड अभिनेत्यांनी जबरदस्त मस्ती केली.
आयफा पुरस्कार सोहळ्याला आयुष्मान खुराना, वरुण धवन, अर्जुन कपूर, कार्तिक आर्यन यांनी उपस्थिती लावली. करण जोहरच्या खुमासदार होस्टींगने कार्यक्रमाला रंगत आणली.
या कार्यक्रमात आयुष्यमान खुरानाने करण जोहरला किस केले. या मुलांच्या मस्तीत श्रद्धा कपूर बाजूला जावून उभी राहिली.
टेलिव्हीजनमधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी मौनी रॉयने या पुरस्कार सोहळ्यात धमाकेदार नृत्य सादर केले. मौनी, अक्षय कुमारसोबत गोल्ड मध्ये झळकणार आहे. याशिवाय आलिया-रणबीरच्या ब्रह्मास्त्रमध्ये पाहायला मिळेल.
ग्रीन कार्पेटवर वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी एकत्र एन्ट्री केली.
आयफाच्या ग्रीन कार्पेटवर अभिनेत्री डायना पेटी आणि कृती सेनन यांचा जबरदस्त जलवा.
रेस ३ च्या बॉक्स ऑफिसवर धमाक्यानंतर बॉबी देओल पुरस्कार सोहळ्यात या स्टायलिश अंदाजात दिसला. तर कोंकणा सेनने नेव्ही ब्लू रंगाच्या गाऊनमध्ये वर्णी लावली.
अनिल कपूरचा झक्कास अंदाज. तर दिया मिर्जा पती साहिल सांगा सोबत उपस्थित होती.
सिंगल युलिया वेंतुर आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांनीही आयफाच्या ग्रीन कार्पेटवर वर्णी लावली.