Hema Malini on Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) राजकीय विषयांवर आपलं मत स्पष्टपणे मांडत असते. दरम्यान कंगना रणौत निवडणूक (Election) लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. कंगना रणौत (Kangana Ranaut) उत्तर प्रदेशातील मथुरा (Mathura) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (lok sabha election) लढवू शकते अशी चर्चा आहे. ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) सध्या मथुरा मतदारसंघातून खासदार आहेत. भाजपच्या (bjp) तिकिटावर त्या मथुरेतून दोनदा निवडणूक जिंकल्या आहेत. या चर्चेबाबत हेमा मालिनी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी टोला लगावला आहे. (Kangana Ranaut contest from Mathura Hema Malini taunt)
हेमा मालिनी (Hema Malini) शनिवारी मथुरेत होत्या त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कंगना रणौत (Kangana Ranaut) निवडणूक लढवणार असल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर बोलताना, "चांगली गोष्ट आहे, माझा देवावर विश्वास आहे. भगवान श्रीकृष्णाला सर्व काही माहीत आहे. इथून खासदार होण्याची इच्छा असलेल्या इतर कोणालाही तुम्ही निवडून देणार नाही. तुम्ही लोकांनी प्रत्येकाच्या मनात इथून फक्त फिल्मस्टारच निवडूण येईल असं चित्र निर्माण केलं आहे. तुम्हाला फक्त मथुरेत फिल्म स्टारचीच गरज आहे. उद्या राखी सावंतलाही पाठवाल," असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Mathura, Uttar Pradesh: When asked about speculation that actor Kangana Ranaut could contest elections from Mathura, BJP MP Hema Malini says, "Good, it is good...You want only film stars in Mathura. Tomorrow, even Rakhi Sawant will become." pic.twitter.com/wgQsDzbn5Z
— ANI (@ANI) September 24, 2022
काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने तिच्या कुटुंबासह वृंदावनच्या मंदिरांना भेट दिली आणि तेथे प्रार्थना केली. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कंगना म्हणाली होती, 'हे आमचे भाग्य आहे की आम्हाला भगवान कृष्ण आणि राधे माँचे दर्शन घडले. 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. यावेळी भेटीदरम्यान कंगनाने राजकारणाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला होता.
दरम्यान, कंगना गेल्या काह दिवसांपासून वक्तव्ये करत आहेत त्यावरून तिच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. सध्या कंगनाचे तेजस, इमर्जन्सी आणि टिकू वेड्स शेरू हे त्याचे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.