Kangana Ranaut: 'पठाणची एका दिवसाची कमाई तुझ्या...'; म्हणणाऱ्याला कंगनाचं जशास तसं उत्तर

Kangana Ranaut On Pathaan Earning: कंगनाने कोणाचाही थेट उल्लेख न करता केलेल्या ट्वीटवरुन ती ट्रोल होताना दिसत आहे. अशाच एका ट्रोलरला कंगनाने जशात तसं उत्तर दिलं असून सध्या या दोघांमधील संवाद चर्चेत आहे.

Updated: Jan 27, 2023, 03:04 PM IST
Kangana Ranaut: 'पठाणची एका दिवसाची कमाई तुझ्या...'; म्हणणाऱ्याला कंगनाचं जशास तसं उत्तर title=
Kangana Ranaut On Pathaan Earning

Kangana Ranaut On Pathaan Earning: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) मागील काही दिवसांपासून काही ना काही कारणामुळे चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'पठाण' (Pathaan Movie) चित्रपट पाहण्यासाठी दुसऱ्याच दिवशी कंगना चित्रपटगृहामध्ये पोहोचली होती. कंगनाने केवळ शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा चित्रपटच पाहिला असं नाही तर चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक ही केलं. ज्या दिवशी 'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी कंगनाने थेट कोणाचाही उल्लेख न करताना एक ट्वीट केलं होतं. यामध्ये तिने चित्रपटाचं यश पैशांमध्ये मोजणारे मुर्ख आहेत, असं म्हटलं होतं. विशेष म्हणजे कंगनाच्या या ट्वीटवरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

अशाच पद्धतीने कंगनाला ट्रोल करणाऱ्या नीरव मोदी नावाच्या व्यक्तीला जशास तसं उत्तर दिलं आहे. नीरव हा एक अॅथलीट आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये कंगनाला टॅग करताना, "पठाणची एका दिवसाची कमाई तुमच्या पूर्ण आयुष्यातील कमाईपेक्षा जास्त आहे," असा टोमणा मारला. यावर कंगनानेही रिप्लाय केला आहे.

 "निमो भाई माझ्याकडे पैसेच उरलेले नाही. मी माझं घर, माझं ऑफिस सारं काही गहाण ठेवलं आहे ते सुद्धा केवळ एक चित्रपट बनवण्यासाठी. हा चित्रपट भारतीय संविधान आणि या महान देशाबद्दल आपल्याला वाटणाऱ्या प्रेमाचा उत्सव साजरा करणार चित्रपट आहे. पैसे तर सगळेच कमवतात, मात्र असं कोणी आहे का जो ते उडवू शकेल?" असा प्रश्न कंगनाने रिप्लायमध्ये विचारला आहे. 

कंगनाच्या या रिप्लायवर या व्यक्तीने पुन्हा रिप्लाय करत, "जर खरच तुझा संविधानावर विश्वास असेल तर तुला ठाऊक असायला हवं की जर एखादी व्यक्ती थेअटरमध्ये जात असेल तर ती या विचाराने जात नाही की मी मुस्लीम आहे अथवा हिंदू. ते फक्त तीन तासांच्या मनोरंजनासाठी जातात. त्यामुळे हा हेट प्रोपोगांडा करणं बंद करा आणि मला भाऊ म्हणू नका," असं उत्तर दिलं.

या संवादावरुन दोन गट पडले असून काहीजण कंगानाला पाठिंबा देत आहेत तर काहींनी या रिप्लायवरुन तिला पुन्हा ट्रोल केलं आहेत.