Karan Johar Cryptic Post : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर त्याच्या हटके चित्रपटांसाठी ओळखला जातो. करण जोहर हा स्पष्टपणे चित्रपटसृष्टीविषयी अनेक सिक्रेट सांगताना दिसतो. त्या सगळ्यामुळेच त्याचा चॅट शो कॉफी विथ करण हा लोकप्रिय ठरला आहे. त्यात काल म्हणजेच सोमवारी करण जोहरनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये करणनं सर्जरी करण्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सर्जरी केल्यानंतर तुमचा चेहरा बदलू शकतो पण तुमची वृत्ती नाही बदलत.
करणनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये करणनं फिलर्सपासून अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. करण म्हणाला, "फिलर्स केले तरी तुम्हाला समाधान मिळणार नाही. मेकअप करा, वय कमी होतं... तुम्हाला हवे तेवढे बोटॉक्स करा, तुम्हाला मधमाशीने दंश केल्यासारखे वाटेल... नाक बदल्यानं अत्तराचा वास बदलत नाही... शस्त्रक्रियेने तुमचे बाह्य रूपही बदलते. पण तुमची वृत्ती बदलत नाही." खरंतर करणच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे की हे तो कोणासाठी बोलला असेल.
दरम्यान, करणनं असं काही करण्याची ही पहिली वेळ नाही. करणनं या आधी देखील अशी एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली. या आधी गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मे महिन्यात देखील त्यानं अशीच एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी त्यानं म्हटलं होतं की "वक्तशीरपणाबद्दलची सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी तुमच्यात नॅच्युरल टॅलेन्ट असणं महत्त्वाचं आहे. पदवी असणं किंवा आई-वडिलांची परवानगी असणं गरजेचं नाही. ही कोणतीही कला नाही, जी अभ्यास केल्यानं मिळते. हा एक शिष्ठाचार आहे. जे दुसऱ्या लोकांच्या वेळेचा आदर करतात त्यामुळे त्यांच्या वेळेचा मान ठेवतात."
हेही वाचा : 'बहुत गर्मी' म्हणत एअरपोर्टवर उर्फीनं काढले कपडे!
आता करण जोहरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं दिग्दर्शित केलेला 'रॉकी और रानी की प्रेम' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत होते. तर जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे कलाकार देखील या चित्रपटात पाहायला मिळाले.