KBC 14: सध्या KBC 14 च्या निमित्ताने बीग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या सीझनची त्यांच्या चाहत्यांच काय अख्ख्या देशाला उत्सुकता लागून राहिली होती.
10 ऑगस्ट 2022 रोजी कौन बनेगा करोडपती-14 (KBC 14) च्या एपिसोडमध्ये कोलकाता येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर श्रुती डागा हॉट सीटवर बसल्या होती. खरंतर हा एक रिएलिटी शो जरी असला तरी हा खेळ आपली बुद्धीमत्ता तपासतो. हॉट सीटवर बसलेल्या श्रुती डागा यांची बुद्धीमत्ता पाहून तर उपस्थित प्रेक्षकच नाही तर खुद्द अमिताभ बच्चनही खक्क झाले होते.
आजपर्यंत गेल्या वीस वर्षांत अमिताभ बच्चन यांना अनेक हरहून्नरी, बुद्धिमान स्पर्धक भेटले असतील पण यावेळी मात्र श्रुती यांचे अमिताभ बच्चन यांनी विशेष कौतुक केले.
तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या श्रुती गेल्या चार वर्षांपासून कोलकात्यात राहत आहेत. बुधवारी त्या बिग बींसमोर प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हॉट सीटवर बसल्या आणि एका प्रश्नाचे त्यांनी दिलेले सहज उत्तर पाहून बीग बींनी त्यांचे कौतुक केले. तो प्रश्न 50 लाखांचा होता आणि जो सोडवण्यासाठी श्रुती यांनी कुठलीच लाईफलाईन वापरली नाही.
50 लाखांचा प्रश्न! तुम्हालाही बरोबर उत्तर माहित आहे का?
प्रश्न- भारतातील राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय कोणत्या संस्थेने विकसित केले आहे आणि त्याचे व्यवस्थापन केले आहे?
A. Indian Institute of Science
B. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर
C. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
D.एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी
अमिताभ बच्चन यांनी 50 लाख रुपयांचा प्रश्न विचारला असता श्रुती जरा वेळ स्तब्ध झाल्या होत्या. त्यांनी खूप विचार केला. वेळ जात होता पण त्यांनी हार मानली नाही.
या प्रश्नासाठी श्रुती यांनी आपली उरलेली लाईफलाईन वापरली. त्यांनी कॉल अ फ्रेंड या लाईफलाईनवरून आपल्या मित्राला व्हिडिओ कॉल केला. सिव्हिल सर्व्हिसची तयारी करणाऱ्या कॉलेजच्या एका ज्युनिअरला त्यांनी फोन केला पण त्यांना त्याच्याकडून काही मदत मिळू शकली नाही. बिग बींनीही त्यांना अगदी क्विट करण्याचाही सल्ला दिला होता.
पण श्रुती यांनी हार मानली नाही त्यांनी उत्तर दिले – बी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर जे योग्य उत्तर होते. त्यांचे उत्तर अगदी बरोबर आहे असे बिग बी म्हणताच श्रुती यांना आनंदाचा झटका येयचाच बाकी होता. हा नशीबाचा खेळ म्हणावा अथवा काहीही पण आपल्या बुद्धीचा कस श्रुती यांनी अचूक लावला होता.