मुंबई : बिग बॉस 12 चे स्पर्धक भजन सम्राच अनूप जलोटा स्वतःपेक्षा 37 वर्षे लहान असलेल्या गर्लफ्रेंड जसलीन मथारूमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांना भरपूर प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. अनूप जलोटा हे खूप संस्कारी गायक आणि भजन करणारी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. आता 65 वर्षांचे जलोटा 28 वर्षांच्या जसलीनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. अनूप जलोटा यांना देशातील लोकप्रिय गायक म्हणून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
1) अनूप जलोटा यांचा जन्म उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये 29 जुलै 1953 मध्ये झाला. त्यांचे वडिल पुरूषोत्तम जलोटा पंजाबच्या प्रख्यात शाम चौरासी घराण्याशी संबंधीत आहेत. जलोटा यांनी वयाच्या 7 व्या वर्षी गायनाला सुरूवात केली. अनूप यांच शिक्षण लखनऊच्या भातखंडे म्युझिक इंस्टीट्यूटमध्ये झाली.
2) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भजन सम्राट अनूपने मुंबईमध्ये येण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी भरपूर संघर्ष केला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ऑल इंडिया रेडिओमध्ये 30 संगीतकारांसोबत गाण्याची संधी मिळाली. यासाठी जलोटा यांनी 320 रुपये महिना मिळत असे.
3) मायानगरी मुंबईत आल्यावर त्यांची गाणी हिट झाली आणि त्यांना म्युझिक कंपन्यांकडून गाण्यांची ऑफर मिळाली. त्यावेळी एखादीच अशी म्युझिक कंपनी असले ज्यासोबत त्यांनी काम केलं नाही.
4) 'ऐसी लागी लगन', 'मैं नहीं माखन खायो', 'रंग दे चुनरिया', 'जग में सुंदर दो नाम' आणि 'चदरिया झीनी रे झीनी' सारखी भजनं अतिशय लोकप्रिय झाली. भजनांना मंदिराच्या दारापासून मंचापर्यंत आणण्याचं काम अनूप जलोटा यांनी केलं. अनूप जलोटा असं म्हणायचे की, जर मी 16 व्या वर्षी भजन गाऊ शकतो तर लोकं या वयात भजन का ऐकू शकत नाहीत.
6) लोकप्रिय तबला वादक झाकिर हुसैन आणि संगीतकार गुलाम अली यांच्यासोबत परदेशात देखील अनूप जलोटा यांनी कार्यक्रम केले. 1984 ची घटना एकदा परदेश दौऱ्याच्या दरम्यान गझलचा कार्यक्रमच होता. तो हाऊसफुल झाल्यमुळे लोकांनी हॉलच्या काचा फोडून हा कार्यक्रम पाहिला.
7) भजन आणि गझल गायक अनूप जलोटा यांनी सितारा ग्रुप नावाची फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू केली. याच्या अंतर्गत त्यांनी हिंदी आणि भोजपुरी सिनेमे तयार केले. यामध्ये बनी चौधरी त्यांची पार्टनर होती.
8)अनूप जलोटा यांनी पहिलं लग्न बिना कुटुंबियांच्या सहमतीने आपली गुजराती शिष्या सोनाली शेठसोबत केलं. या जोडीने गायन क्षेत्रात 'अनूप - सोलानी' नावाने खूप नाव कमावलं.
9) अनूप जलोटा यांचा दुसरा विवाह कुटुंबियांच्या सहमतीने बीना भाटीयाशी केलं. मात्र त्यांच लवकरच घटस्फोट झाला.
10) तिसरं लग्न अनूप जलोटा यांनी 1994 मध्ये मेधा गुजरालसोबक केला. मेधा माजी पंतप्रधान आय के गुजराल यांची भाची आणि लोकप्रिय दिग्दर्शक शेखर कपूरची पहिली पत्नी होती. मेधाचं 25 नोव्हेंबर 2014 मध्ये न्यूयॉर्कमध्ये हार्ट अटॅक आणि किडनी ट्रान्सप्लान्ट दरम्यान निधन झालं.