Malaika Arora Birthday: मलायका अरोरा (Malaika Arora Birthday) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं अनेक आयटम्स डान्स केले आहेत. 'चल छैय्यां-छैयां' असो, 'मुन्नी बदनाम हुई' आणि 'अनारकली डिस्को चली' या गाण्यांमधून खऱ्या अर्थानं तिला प्रसिद्धी मिळाली. आज म्हणजेच 23 ऑक्टोबरला अभिनेत्री तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. जरी 49 ची झाली असली तरी तिचं वय दिसून येत नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण तिनं या वयातही वर्कआऊट आणि योगाच्या मदतीने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे, ती रिव्हर्स एजिंगसाठी ओळखली जाते. मलायकाच्या फॅशनने लाखो दिवाने आहेत. अनेकदा तिच्या फॅशनमुळे ती अडचणीत येते मात्र काही लोकांना तिच्या प्रेरणा देखील मिळते हे विसरुन चालणार नाही. (malaika arora birthday this shocking story came out nz)
अरबाज आणि मलायका दोघेही कॉफीच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान पहिल्यांदा भेटले होते. या भेटीनंतर त्यांच्यातली जवळीकता वाढू लागली आणि ते पाच वर्षे डेट करत होते. मलायकाने 12 डिसेंबर 1998 मध्ये बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अरबाज खानसोबत लग्न केले. दोघांनीही अतिशय फिल्मी पद्धतीने लग्न केले. 18 वर्षांहून अधिक काळ एकत्र राहिल्यानंतर त्यांनी मार्च 2016 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही एक मुलगा अरहान आहे. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.
मलायका आणि अरबाजने वेगवेगळ्या रितीरिवाजांनी दोनदा लग्न केले, दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. मलायका आणि अरबाज यांनी आधी चर्चमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि नंतर दोघांनी इस्लामिक रितीरिवाजांनुसार लग्न केले. अशा प्रकारे दोघांनीही त्याच्या धर्मांना मान देत लग्न केले. तुम्हाला माहितच असेल की मलायका आणि अरबाज अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मलायकाने 2008 मध्ये एक चित्रपट निर्माते म्हणून पदार्पण केले, माजी पती अरबाज खान सोबत, अरबाज खान प्रॉडक्शन कंपनीची स्थापना केली, ज्याने 'दबंग' चित्रपटांची सीरिज तयार केली आहे. अभिनेत्री म्हणून, मलायका अरोराने कांटे (2002) आणि EMI (2008) या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. डान्सर म्हणून, ती छैय्या छैय्यां (1998), गुर नालो इश्क मीठा (1998), माही वे (2002), काल धमाल (2005) आणि मुन्नी बदनाम हुई (2010) या डान्स आयटमसाठी ओळखली जाते.