मुंबई:कांगना राणैतचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या निवास स्थानी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्यासाठी खास सिनेमाचे प्रदर्शन आयोजीत केले.राष्ट्रपतिंनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरुन स्क्रीनिंगचे फोटो शेअर केले आहेत. पण करणी सेनने सिनेमाच्या प्रदर्शनास नकार दिला आहे.करणी सेनेला लक्ष्मीबाई यांचे ब्रिटीश आधिकारी यांच्यासोबत दाखवलेल्या सीनला विरोध आहे.त्याचप्रमाणे राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रीत केलेल्या गाण्याला विरोध केला आहे .गाण्यात राणी लक्ष्मीबाई यांना डान्स करताना दाखवल्यामुळे सिनेमाला प्रदर्शित करण्यास करणी सेना विरोध दर्शवत आहे.करणी सेनेने सिनेमाच्या निर्मात्यांना धमकी दिली आहे. सिनेमा आधी आम्हाला दाखवा नाही तर सिनेमाला हिंसक वळण लागेल.
करणी सेनेकडून होणाऱ्या विरोधाला कांगनाने चांगलेच प्रतीउत्तर दिले आहे.कंगणा म्हणाली, मी कोणाला घाबरत नाही. लढल्याशिवाय मी हिम्मत हारणार नाही. चार इतिहासकारांनी मणिकर्णिका सिनेमा पाहिला आहे. सेन्सर बोर्डाने सिनेमाला मान्यता दिली. करणी सेना मला सारखा त्रास देत आहे. त्यांना माहित आहे मी सुध्दा एक राजपूत आहे, आणि एक-एक करुन सगळ्यांना नष्ट करेल.