Mugdha Godse: अनेक कलाकार हे आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत परंतु त्यांच्यासाठी येथे पोहचणं काही सोप्पं नाही. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात त्यांना संघर्ष करावा लागतो. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर त्यासाठी या कलाकारांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यातून मुंबईच्या ग्लॅम सिटीमध्ये येयचे असेल किंवा बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमायचे असेल तर या कलाकारांना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो. त्यातून अभिनेत्री व्हायचं असेल तर त्यासाठीही अनेक गोष्टी या कराव्या लागतात. आज या लेखातून आपणही अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिलाही संघर्ष चुकलेला नाही आणि बॉलिवूडमध्ये येण्यापुर्वी ती चक्क पेट्रोल पंपावर काम करत होती. त्यासाठी ही अभिनेत्री दिवसाला चक्क 100 रूपयेच कमावत होती. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे.
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचं नावं आहे मुग्धा गोडसे. मुग्धा ही मराठमोळी अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचेही अनेक जण फॅन्स आहेत. त्यातून तिनं 'मराठी पाऊल पडते पुढे' या मराठी रिएलिटी शोचं परीक्षण केले होते. यावेळी तिच्यासोबत अभिनेते आणि दिग्दर्शक मकरंद देशपांडेही होते. हा शो 2011 मध्ये आला होता. त्यावेळी मराठी घराघरात हा कार्यक्रम पाहिला जात होता. त्यामुळे या शोची तेव्हा तरूणपिढीपासून ते अगदी कुटुंबातील प्रत्येक सदस्यामध्ये या शोची चर्चा होती. हा शो तेव्हा चांगलाच गाजला होता. आजही या शोचे अनेकजणं चाहते आहेत. तेव्हा चला तर मग पाहुया या अभिनेत्रीचा नक्की संघर्ष काय होता?
हेही वाचा - TMKOC : जेनिफरनंतर आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप, म्हणाली 'ते वाट पाहात होते'
अभिनेत्री मुग्धा गोडसे हिचा जन्म 26 जूलै 1986 रोजी झाला. चित्रपटक्षेत्राची फारसा संबंध नसता ती मॉडेलिंग तसेच अभिनय क्षेत्रात आली होती. ती मिस इंडिया या स्पर्धेतही सहभाग दर्शवला होता. 2004 साली ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यावेळी ती सेमी-फायनलपर्यंतही पोहचली होती. त्यानंतर ती मधूर भांडारकर यांच्या 'फॅशन' या चित्रपटातून कामं केले होते. यानंतर तिला प्रचंड यश मिळाले होते. त्यापुढे 'हिरोईन', 'साहेब बीवी और गॅंगस्टर', 'जेल', 'ऑल द बेस्ट' अशा चित्रपटांतून तिनं भुमिका निभावल्या होत्या. त्यातून तिनं मराठी आणि दाक्षिणात्त्य चित्रपटांतूनही कामं केली आहेत.
परंतु याही आधी ती पेट्रोल पंपावर कामाला होती. त्यामुळे तिला या क्षेत्रात येण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता, असं मीडिया रिपोर्ट्समधून कळते आहे.