मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते. मीरा राजपूत आपले स्किन केअर रूटीन, योग आणि फिटनेस टिप्स शेअर करत असते. इंस्टाग्रामवर मीरा आपल्या स्किन आणि शरीराची खूप काळजी घेताना दिसते. मीराने एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये दररोज सकाळी मीराला कोणत्या तीन गोष्टी खूप ऍक्टिव ठेवतात. याबाबत तिने माहिती दिली आहे.
मीरा सांगते की, सकाळी उठल्यावर कॉफी पिण्याच्या अगोदर ती या तीन गोष्टी करते. ज्यामुळे तिला अतिशय फ्रेश वाटतं. सगळ्यात आधी ती 12 वाजता अनूलोम-विलोम करते. त्यानंतर शरीराला आवश्यक असलेले व्यायाम प्रकार करते. यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढते. या व्यायामामुळे दिवस खूप चांगला जातो. यानंतर तिसरी गोष्ट मीरा करते ती म्हणजे ती रिकामी पोटी किशमिश म्हणजे मनुके आणि केसरचं पाणी पिते. यामुळे मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो.
मीराने शेअर केला व्हिडीओ मीराने व्हिडीओ शेअर करत सांगितलं की,'तीन गोष्टी ज्या मी सकाळी उठल्यावर करते. जवळपास 7 वेळा अलार्म स्नूज करते. त्यानंतर 12 राऊंड अनूलोम-विलोम करते. हे माझ्यासाठी एस्प्रेसो शॉट्ससारखे आहेत. यामुळे तुम्ही दिवसभराकरता अतिशय स्वस्थरूपात तयार होता. यामुळे तुम्ही शांत राहता' मीरा पुढे सांगते की, पोश्चर चांगल राहण्यासाठी ती व्यायाम देखील करते. यामुळे माझी उभ राहण्याची पद्धत आणि स्वतःला कॅरी करण्याकरता वेगळी मदत करता. योग्य आणि सोपे व्यायाम प्रकार करा. आपले खांदे, मान आणि छात अधिक मोकळी होते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह अधिक चांगला होतो.