मुंबई : गरोदरपणाच्या दिवसांत अभिनेत्री त्यांच्या बेबी बंपचे सर्व फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आई होणे ही प्रत्येकासाठी खूप सुंदर भावना असते. अर्थात मुलाला जन्म देणे हा जगातील सर्वात मोठा आनंद आहे. दुसरीकडे, बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी मिसकॅरेजचा सामना केला. या अभिनेत्रींपैकी एका अभिनेत्रीने तर कधीचं मातृत्वाचं सुख अनुभवलं नाही. आज अशा अभिनेत्रींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री अमृता राव
अमृता रावच्या घरी 2020 साली पाळणा हालला. पण मुलाच्या जन्माआधी अमृताने मिसकॅरेजचा सामना केला आहे. अमृताने आधी काही गुंतागुंतीमुळे सरोगसीचा पर्याय निवडला होता पण तिची सरोगसी यशस्वी झाली नाही आणि तिचा गर्भपात झाला.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2009 मध्ये लग्न केले, 2012 मध्ये शिल्पाने विआनला जन्म दिला. पण त्याआधी शिल्पा तिच्या लग्नानंतर काही महिन्यांतच गरोदर राहिली होती, पण काही अडचणी असल्यामुळे अभिनेत्रीला मिसकॅरेजचा सामना कराला लागाला.
अभिनेत्री सायरा बानो
दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती... खऱ्या प्रेमाचं उदाहरण म्हणजे दिलीप कुमार आणि सायरा बानो... लग्नाच्या 6 वर्षांनंतर सायरा बानो गरोगर राहिल्या. पण बीपीच्या त्रासामुळे आठव्या महिन्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या बाळाला गमावलं. त्यानंतर त्या आई होऊ शकल्या नाहीत.
गौरी खान
शाहरुख खान आणि गौरी खान यांनीही आपलं मूल गमावले आहे. आज शाहरुख आणि गौरीला तीन मुले आहेत, पण गौरीचा पहिला मुलगा आर्यनच्या जन्मापूर्वी गर्भपात झाला होता. 1997 मध्ये गौरीला गर्भपाताचा सामना करावा लागला होता.
किरण राव
आमिर खान- किरण आणि आमिरचे 2005 मध्ये लग्न झाले, दोघे आता विभक्त देखील झाले आहेत. किरण 2009 मध्ये गरोदर होती पण गर्भपातामुळे तिने बाळ गमावले. यानंतर या जोडप्याने सरोगसीचा पर्याय निवडला आणि पहिल्या बाळाला जन्म दिला.
अभिनेत्री काजोल
न्यासाच्या जन्मापूर्वी एक्ट्रोपिक प्रेग्नेंसीमुळे काजोलचा गर्भपात झाला होता. सहा आठवड्यांनंतरच काजोल आणि तिचा पती अजय यांना समजले की या गर्भधारणेमुळे काजोलची तब्येत बिघडू शकते. यानंतरच काजोलचा गर्भपात झाला.