मुंबई : गायक सोनू निगमने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत त्याने संगीत क्षेत्रातील भीषण वास्तव समोर आणून हे रोखलं नाही तर इथेही आत्महत्या होतील असं म्हटलं आहे. यामध्ये त्याने टी सीरिजच्या मालकावर निशाणा साधला आहे. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूषण कुमारला इशारा दिला आहे अन्यथा खळखट्याक.....
भूषण कुमार यांनी पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचे गाणे हटविण्यास सांगितलं आहे. असे जर केले नाही तर ही गोष्ट त्यांना महागात पडेल अशा इशाराही टी-सीरिजच्या मालकाला दिला आहे. यामुळे आता भूषण कुमार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (सोनू निगमची टी-सीरिजच्या मालकाला धमकी)
Posted by Ameya Khopkar on Tuesday, June 23, 2020
अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भूषण कुमारला इशारा दिला आहे. सोनू निगम यांनी केलेल्या आरोपानुसार माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही. केलेले आरोप खरे असतील तर मागे पुढे पाहणार नाही. आतिफ अस्लम हा पाकिस्तानी गायक आहे. त्यामुळे तात्काळ त्याचे गाणे टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनलवरून काढून टाका. 'भूषण कुमार तू याला धमकी समज पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तर तुला खूप महागात पडेल.'
सोनू निगमने काही दिवसांपूर्वी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ही आत्महत्या होऊ शकते असं वक्तव्य करून सगळ्यांनाच धक्का दिला आहे. सोनू निगमच्या दुसऱ्या व्हिडिओत त्याने म्युझिक इंडस्ट्रीत लोकप्रिय असलेल्या टी-सीरिज कंपनीचे मालक भूषण कुमार यांच नाव घेतं धमकी दिली आहे. एवढंच नव्हे तर सोनू निगमने आपल्या या व्हिडिओत मॉडेल मरीना कंवरचं नाव घेत देखील धमकी दिली आहे. जर माझ्याशी पंगा घेतलात तर मी मरीनाचा व्हिडिओ यूट्यूबवर चॅनलवर शेअर करेन.