Munna Bhai 3 : 'मुन्ना भाई 3' विषयी काय म्हणाला संजय दत्त?

'मुन्ना भाई 3' सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता... आगामी सिनेमाबद्दल अभिनेता संजय दत्तची मोठी घोषणा...  

Updated: Apr 18, 2022, 04:12 PM IST
Munna Bhai 3 : 'मुन्ना भाई 3' विषयी काय म्हणाला संजय दत्त?  title=

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या प्रसिद्ध सिनेमांमधील एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'मुन्ना भाई' आणि सिनेमाची फ्रेंचायजी... प्रेक्षकांनी संजय दत्त स्टारर 'मुन्ना भाई एमबीबीएस ' आणि 2006 साली प्रदर्शित झालेल्या 'मुन्ना भाई' या दोन्ही सिनेमांना प्रचंड प्रेम दिलं. आता 'मुन्ना भाई 3' सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.. 'मुन्ना भाई 3' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

बॉलीवुडलाइफला दिलेल्या मुलाखतीत, संजय दत्तने 'मुन्ना भाई 3' सिनेमाबद्दल मोठी घोषणा केली आहे. सिनेमा लवकरचं रुपेरी पडद्यावर येणार आहे आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी सिनेमाबद्दल सकारात्मक विचार करत असल्याचं संजयने सांगितलं आहे. 

संजय म्हणाला, 'नक्कीचं... मुन्ना भाई 3 साठी शक्य तेवढे प्रयत्न करू. दिग्दर्शक राजकुमार हिरानी सिनेमा तयार करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे मला अपेक्षा आहे, की लवकरचं सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल...'

संजूबाबा पुढे म्हणाला, 'आम्ही अन्य सिनेमे देखील केले आहेत. 'पीके' देखील केला आहे. भविष्यात देखील अनेक असे सिनेमे करू....  महत्त्वाचं म्हणजे 'मुन्नाभाई 3' देखील लवकरचं चाहत्यांच्या भेटीस येईल...' असा विश्वास संजय दत्तने चाहत्यांनी दिला. 

मुन्ना भाई एमबीबीएसमध्ये संजय दत्त, अर्शद वारसी आणि बोमन इराणी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर 'मुन्ना भाई' मध्ये अभिनेत्री विद्या बालन देखील होती.. आता 'मुन्नाभाई 3' कधी प्रदर्शित होईल... या प्रतीक्षेत चाहते आहेत.